देशविदेश

ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी अमृता फडणवीस यांनी गाऊ नये यासाठी ऑनलाइन याचिका

Share Now

मुंबई – विरोधीपक्ष नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये येत्या गुरुवारी माझे अजून एक गाणे येत आहे, त्यावरही ट्रोलिंग करा. सर्वांचे स्वागत असल्याचे म्हणत आपल्या नवीन गाण्याची घोषणा केली. पण नेटकऱ्यांनी अमृता यांनी केलेली घोषणा आणि त्यामधील ट्रोलिंगचे आमंत्रण फारच गांभीर्याने घेतल्याचे दिसत असल्यामुळेच अमृता यांच्या गाण्यासंदर्भातील बातमी समोर आल्यानंतर हे गाणे येण्याआधीच आता नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

मृता यांचे नवे गाणे येत्या गुरुवारी येणार असून हे गाणे ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी रिलीज केले जाऊ नये अशी मागणी करणारी ऑनलाइन याचिकाच चेंज डॉट ओआरजी या वेबसाईटवर तयार करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या ऑनलाइन याचिकेचे काही तासांमध्ये ४०० हून अधिक जणांनी समर्थन केले आहे.

येत्या गुरुवारी मी गायलेले एक गाणे रिलीज होत असून हे गाणे एका सस्पेन्स चित्रपटातील असल्याचे अमृता यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सांगितले. तसेच हे येणारे नवीन गाणे हे प्रमोशनल साँग असून प्रत्यक्षात चित्रपटातही त्याचा वापर करण्यात आला आहे. हे गाणे एन्जॉय करा, ट्रोल करा पण नक्की पाहा असे आवाहनही अमृता यांनी केले. पण हे गाणे रिलीज होण्याआधीच ट्रोलर्सने अमृता यांना पुन्हा लक्ष्य केले आहे.

हुनमंत ढोमे नावाच्या युझरने सोमवारी (१४ डिसेंबर २०२०) रोजी चेंज डॉट ओआरजी या वेबसाईटवर पर्यावरणाचे सौरक्षण करण्यासाठी आणि ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी अमृता फडणवीस यांनी गाऊ नये, अशी ऑनलाइन याचिका दाखल केली आहे. अमृता यांचा या ऑनलाइन याचिकेच्या डिस्प्रिप्शनमध्ये उल्लेख मामी असाही करण्यात आला आहे. पुढच्या गुरुवारी मामींचे नवीन गाणे येणार आहे. या गाण्याने होणारे ध्वनिप्रदूषण माणसाला घातक ठरू शकते. हे गाणे त्यांनी रिलीज करू नये यासाठी आपण पेटीशन साइन करणे गरजेचे असल्याचे या याचिकेच्या डिस्प्रिप्शनमध्ये म्हटले आहे. तसेच पुढे, आपला कान, आपली जबाबदारी, असेही लिहिण्यात आले आहे.


Share Now
error: Content is protected !!