आरोग्य देशविदेश

सर्वात मोठी बातमी – दिल्लीला लंडनहून आलेले 5 प्रवासी कोरोना पॉझिटीव्ह

Share Now

नवी दिल्ली – कोरोनाचा नवीन प्रकार ब्रिटनमध्ये आढळल्यामुळे भीतीचे वातावरण असून काल रात्री लंडनहून दिल्लीत आलेल्या विमानात पाच लोक कोरोनाबाधित आढळले आहेत. एकूण 266 लोक त्या विमानात होते. पॉझिटिव्ह आढळलेल्या लोकांचा नमुने संशोधनासाठी नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोलकडे (NCDC) पाठवण्यात आले. सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्सना क्वारंटाइन करण्यात आले आहे. ही माहिती दिल्लीतील कोविड-19च्या नोडक अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिली.

यादरम्यान मुंबईतही लंडनहून आलेल्या दोन विमानातील प्रवाशांना विमानतळावरून थेट हॉटेलमध्ये नेण्यात आले. त्यांना तेथे आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येईल. दरम्यान यावर काही प्रवाशांनी नाराजी दर्शवली आहे. आम्हाला याबाबत कोणतीच काही माहिती दिली नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. अलिकडेच कोरोनाचा नवीन प्रकार (बदलेले रूप) ब्रिटनमध्ये आढळले आहे. हा पहिल्यापेक्षा 70% अधिक संक्रामिक असल्याचे म्हटले जात आहे.

Share Now
error: Content is protected !!