Gunratna sadavarte Latest News – मेहुण्यावरचं प्रेम, एसटी बँकेत गुणरत्न सदावर्ते यांचा गेम? काय आहे प्रकरण?

3 Min Read

Majhi Batmi Online : गेल्या काही महिन्यांपूर्वी  गुणरत्न सदावर्ते यांच्या संघटनेनं एसटी कर्मचारी बँकेत सत्ता मिळवली.

मात्र मेहण्यावरचं अती प्रेम आणि मनमानी कारभाराच्या आरोपात १९ पैकी १४ संचालक नॉट रिचेबल झालेत हे संचालक काही दिवसात आपली भूमिका मांडणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र यावर गुणरत्न सदावर्ते यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. मी कष्टकऱ्यांचा आवाज आहे, असे म्हणत डंके की चोटपर एसटी विलनीकरणाचा वायदा देणारे सदावर्ते आता अडचणीत आलेत. आपण कष्टकऱ्यांचा आवाज असल्याचा दावा सदावर्ते करतात मात्र करण्यात आलेल्या आरोपांनुसार मेहुण्यावरचं प्रेम त्यांच्या एसटी बँकेवरच्या सत्तेला सुरूंग लावू शकतं. काय काय आरोप करण्यात आले गुणरत्न सदावर्ते यांच्यावर…

जानेवारी महिन्यामध्ये स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप बँकेच्या निवडणूक झाली होती. या निवडणुकीत गुणरत्न सदावर्ते यांच्या पॅनलचे 19 जागा जिंकल्या होत्या. पण आता सदावर्तेंना मोठा धक्का बसला आहे. 19 पैकी 14 सदस्य हे नॉट रिचेबल झाले आहे. या 14 जणांनी सदावर्तेंच्या विरोधात मैदानात उतले आहे. सदावर्ते यांच्यामुळे एसटी बँक अडचणीत आली आहे, असा आरोपच केला आहे.

‘एसटी को ऑपरेटीव्ह संचालक मंडळामध्ये सदावर्ते पॅनलचे सदस्य निवडून आले होते. पण सदावर्ते यांचा काहीही संबंध नव्हता. ते सदस्य किंवा सभासदही नव्हते. पण तरीही आमच्या भोळ्या भाबड्या सदस्यांना चुकीची माहिती देऊन, धमकावलं. त्यांच्याकडून चुकीची विधान झाली. त्यांनी दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणारी वक्तव्य

- Advertisement -

केली. त्यांच्या या अशा विकृत वागण्यामुळे कर्मचाऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली. म्हणून सन्मानिय सदस्यांच्या कामात सदावर्ते हे बळजबरीने हस्तक्षेप करत होते. ते सभासदांना कोणताही निर्णय घेण्याची मुभा देत नव्हते. त्यामुळे त्यांची जी काही समाजामध्ये विकृत चाळे चालू आहे, त्यामुळे मागील दोन महिन्यात सदस्यांनी ठेवी काढून घेतली. जवळपास 200 कोटी निधी काढून घेतला आहे. अनेक सदस्य हे ठेवी काढून घेत आहे, अशी माहिती एसटी कष्टकरी जनसंघ माजी उपाध्यक्ष संतोष शिंदे यांनी दिली आहे.

आरबीआयच्या नियमानुसार, सीडी रेशो वाढला आहे. कर्ज देण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना अडचणी येत आहे. त्यामुळे सभासदांनी चांगले पाऊल उचलले आहे. सभासद आणि संचालक आहे त्यांनी उठाव केला आहे, त्यांना आमचा पाठिंबा आहे. आमची महाराष्ट्रातील कर्मचारी तुमच्या सोबत आहे. बँक वाचवण्यासाठी या विकृत माणसाच्या विरोधात निर्णय घेतला आहे, आम्ही तुमच्यासोबत आहोत, अशी ग्वाही देत आहोत, असंही संतोष शिंदे यांनी सांगितलंय.

बँकेचे अनेक संचालक उठाव करण्याच्या तयारीत आहे. गुणरत्न सदावर्ते हा विकृत आणि विक्षिप्त माणूस आहे. या माणसाने एसटी कर्मचाऱ्यांच्या बँकेमध्ये राजकारण आणले. बँकेचा उपयोग राजकारणासाठी करण्यात आला.

मराठा समाज किंवा धनगर समाज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधाने सदावर्ते यांनी केली आहे, त्यामुळे बँकेतील शेकडो कोटींच्या ठेवी सभासदांनी काढून नेल्या आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

Share This Article