maharashtra

वकील गुणरत्न सदावर्ते यांनी शिवस्वराज्य दिनाला विरोध केल्यानंतर हसन मुश्रीफ आक्रमक

Share Now


कोल्हापूर : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ शिवस्वराज्य दिन रोखण्याची कुणाची ताकद आहे? असे म्हणत वकील गुणरत्न सदावर्ते यांनी शिवस्वराज्य दिनाला विरोध केल्यानंतर आक्रमक झाले आहेत. शिवस्वराज्य दिन कोणत्याही परिस्थितीत साजरा होणार आहे. त्याचबरोबर भाजपची गुणरत्न सदावर्ते यांना फूस असल्याचा आरोप देखील हसन मुश्रीफ यांनी केला आहे.

भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण करुन राष्ट्रगीत गाणे म्हणजे राष्ट्रद्रोह आहे, या कृतीमुळे देशातील एकता आणि अखंडता धोक्यात येऊ शकते, असे मत अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी मांडले होते. 6 जूनला भगवा ध्वज फडकावून शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून सर्व शासकीय कार्यालयांना तशा प्रकारचे आदेश देण्यात आले आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयावर अॅड. सदावर्ते यांनी टीका करत मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिले होते.

संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये रविवारी होणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन ‘शिवस्वराज्य दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार राज्यात आता 6 जूनला भगवा ध्वज फडकावून शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या सर्व शासकीय ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद कार्यालयांना 1 जून रोजी तशा प्रकारचा सरकारी आदेश जारी करण्यात आला आहे. त्यामुळे उद्या होणारा शिवस्वराज्य दिन कसा साजरा करायचा यावरुन राज्यातील राजकारण तापण्याची शक्यता आहे.

The post वकील गुणरत्न सदावर्ते यांनी शिवस्वराज्य दिनाला विरोध केल्यानंतर हसन मुश्रीफ आक्रमक appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/2TLHXTR
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!