maharashtra

अभ्यासक म्हणतात; दारूचे व्यसन लग्न केल्यामुळे होते कमी

Share Now


सध्याच्या घडीला दारू पिणे हे अनेकांचा शौक नाही तर, व्यसन बनले आहे. काही लोक तर, दारूच्या एवढे आहारी जातात की, त्यांना दारू पिल्याशिवाय काहीच सुचत नाही. दारूचे व्यसन असलेल्या माणसाला त्याचे संपूर्ण कुटूंब वैतागलेले असते. म्हणूनच अनेक उपाय अशा व्यक्तिंचे दारूचे व्यसन सोडविण्यासाठी केले जातात. दारू सोडविण्याबाबत जगभरात अभ्यास सुरू आहे. दरम्यान, भलतेच निरीक्षण वर्जिनिया यूनिवर्सिटीने केलेल्या एका अभ्यासातून पूढे आले आहे. या अभ्यासात सेक्स आणि दारू याबाबतही आश्चर्यकारक निरिक्षण नोंदविण्यात आले आहे.

वर्जिनिया युनिव्हर्सिटीच्या अभ्यासानुसार, दारूच्या घाणेरड्या व्यसनापासून आपल्याला सुटका मिळवायची असेल तर, लवकर लग्न करा. अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की, विवाहीत लोक हे अविवाहीत किंवा घटस्फोटीत तसेच, एकटे जीवन जगणाऱ्या व्यक्तीच्या तूलनेत कमी प्रमाणात दारूचे व्यसन करतात. त्यातही विवाहीत लोकांनी दारूचे व्यसन केलेच तर, ते ऑकेजनली किंवा अगदीच कमी मात्रेत असते. यात महिला आणि पूरूष अशा दोघांचाही समावेश आहे. अविवाहीत तसेच, सिंगल जीवन जगणारी व्यक्ती मात्र, दारू अधिक मात्रेत आणि नियमीत प्रमाणात पित असते. विवाहीत लोक शरीरसंबंधास (सेक्स) अधिक महत्व देतात. त्यामुळे दारूच्या व्यसनाचा विसर पडतो असेही या अभ्यासात म्हटले आहे.

दरम्यान, एक अभ्यासक डायना डीनेस्कु यांनीही दारूचे व्यसन सोडविण्यासंबंधीचे वर्जिनीया युनिव्हर्सिटीच्या अभ्यासासाशी मिळतेजुळते मत व्यक्त केले आहे. डीनेस्कु यांच्या मते, दारूच्या व्यसनाचे प्रमाण विवाहीत जोडप्यांमधील शारीरिक संबंधांमुळे कमी होते. एवढेच काय ते सुटल्यातच जमा होते. दरम्यान, याच विषयी करण्यात आलेल्या एका सर्व्हेतही ही बाब ठळकपणे पूढे आली आहे. पण डायना डीनेस्कु यांच्या विधानामुळे एक नवाच गोधळ निर्माण होतो आहे तो असा की, विवाहीत जोडप्यांनी सेक्सला महत्व दिल्यामुळे दारूचे व्यसन कमी होते की, दारू कमी पिणाऱ्या व्यक्तिंच्याच लग्नाचे प्रमाण अधिक आहे.

यासंदर्भात टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या एका वृत्तानुसार, वॉशिग्टन येथे झालेल्या संशोधनाचा काही डेटा अभ्यासकांनी अभ्यासासाठी वापरला आहे. जो डेटा दारू, सेक्स आणि विवाहीत जोडपी यांच्या वर्तन आणि स्वभावाशी संबन्धित आहे. या सर्वेक्शनात १६१८ महिला तर, ८०७ पूरूष सहभागी झाले होते.

The post अभ्यासक म्हणतात; दारूचे व्यसन लग्न केल्यामुळे होते कमी appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/3fSTaui
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!