maharashtra

टोलेगंज इमारतीच्या बाल्कनीमध्ये नग्नावस्थेत उभ्या असणाऱ्या महिलांवर दुबई पोलिसांची कारवाई

Share Now


दुबई – सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी दुबई पोलिसांनी महिलांच्या एका ग्रुपवर कारवाई केली आहे. काही महिला नग्नावस्थेमध्ये शहरातील एका उंच इमारतीच्या बाल्कनीमध्ये उभ्या असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केल्याचे असोसिएट प्रेसने दिलेल्या आपल्या वृत्तात म्हटले आहे.

सार्वजनिक ठिकाणी सभ्यता पाळण्यासंदर्भातील नियमांमध्ये नग्नता आणि कायदेबाह्य वर्तन या गुन्ह्यांचा युनायटेड अरब अमिरातीमध्ये समावेश आहे. कोणी या प्रकरणी दोषी आढळल्यास सहा महिने तुरुंगवास आणि पाच हजार दिऱ्हाम्स म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये जवळजवळ एक लाख रुपये दंड शिक्षेची तरतुद आहे. याप्रमाणे पॉर्नोग्राफिक गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करणेही दुबईमध्ये दंडनीय गुन्हा आहे. देशामध्ये इस्लामिक कायद्यांनुसार शरीया कायदे लागू करण्यात आले आहेत. या कायद्यानुसार अश्लील साहित्याची देवाणघेवाण करणे हा गुन्हा आहे. या प्रकरणी या महिलांना दोन वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होण्याची शक्यता मेट्रो या संकेतस्थळाने व्यक्त केली.

दुबईमध्ये शनिवारी उशीरा असाच एक अश्लील व्हिडीओ व्हायरल झाला. एक डझनहून अधिक महिला बाल्कनीमध्ये नग्नावस्थेत या व्हिडीओमध्ये उभ्या असल्याचे दिसत आहे. दुबईतील मरिना येथील एका उंच इमारतीमधील हा व्हिडीओ आहे. दिवसाढवळ्या हा व्हिडीओ शूट करण्यात आला आहे. दुबईमध्ये सार्वजनिक ठिकाणी चुंबन घेणे किंवा परवाना नसताना दारुचे सेवन करणेही गुन्हा असणाऱ्या देशामध्ये असा व्हिडीओ व्हायरल झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. द नॅशनल या सरकारी वृत्तपत्राने हा व्हिडीओ एक पब्लिसिटी स्टंट असल्याचे म्हटले आहे. पण याबद्दलची अधिक माहिती वृत्तपत्राने दिलेली नाही.

या प्रकरणी दुबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेमध्ये कायदेशीर कारवाई सुरु आहे. अशाप्रकारचे वागणे हे मान्य करण्यासारखे नसून हे वागणं अमिरातीमधील संस्कृती आणि मुल्यांशी साधर्म्य साधणारे नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. इतर मध्य आशियाई देशांपेक्षा दुबई अनेक अर्थांनी नवे विचार स्वीकारणारा देश म्हणून ओळखला जातो. पण येथील कायदे कठोर आहेत. सोशल मीडियावर केलेल्या कमेंट आणि व्हिडीओंसाठी अनेकांना अटक करण्यात आल्याची प्रकरणही देशात घडली आहे. येथील कायद्यांमुळेच देशातील अनेक बड्या टेलिकॉम कंपन्यांनी पॉर्नोग्राफीक वेबसाईट बंद केल्या आहेत.

The post टोलेगंज इमारतीच्या बाल्कनीमध्ये नग्नावस्थेत उभ्या असणाऱ्या महिलांवर दुबई पोलिसांची कारवाई appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/3fHC6bb
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!