maharashtra

सीसीटीव्हीत कैद झाल्या CSMTकडे जाताना सचिन वाझे यांच्या हालचाली

Share Now


मुंबई – उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेली स्फोटके आणि मनसुख हिरेन यांच्या हत्या प्रकरणात एनआयएने निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक केलेली आहे. त्यांची मागील काही दिवसांपासून चौकशी सुरू असून, या प्रकरणात नवनवे खुलासे होत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे ४ मार्च रोजी जात असतानाच्या वाझेंच्या हालचाली सीसीटीव्हीत कैद झाल्या आहेत.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रातील रेतीबंदर खाडीत आढळून आला होता. एनआयए त्यांच्या हत्येचा तपासही करत असून, या प्रकरणी सचिन वाझे यांच्यासह आणखी काही जणांना अटक करण्यात आलेली आहे. हिरेन यांचा मृतदेह ५ मार्च रोजी आढळून आला होता. त्यामुळे त्याअगोदर वाझेंच्या हालचालींचा शोध एनआयएकडून घेण्यात येत आहे.

सचिन वाझे यांच्या हालचाली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील सीसीटीव्हीत कैद झाल्या आहेत. ५ मार्च रोजी हिरेन यांचा मृतदेह आढळला होता. त्यांच पूर्वसंध्येला म्हणजे ४ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता वाझे सीएसएमटीकडे जाताना दिसत आहेत. वाझे यांनी सीएसएमटीतून ठाण्याला जाणारी लोकल पकडली होती, असे तपासातून समोर आले असून, एनआयएने वाझेंना सीन रिक्रिएट करण्यासाठी सीएसएमटीकडे आणले होते.

दक्षिण मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये सचिन वाझे यांच्यासाठी बनावट नावाचा वापर करून एक रूम आरक्षित करण्यात आली होती, अशी माहिती तपासादरम्यान एनआयएला मिळाली आहे. त्याची पडताळणी केल्यानंतर ते खरे असल्याचे समोर आले आहे. सीसीटीव्ही चित्रणातून वाझे यांची या हॉटेलमध्ये ये-जा होती, असे स्पष्ट झाले. एनआयए अधिकाऱ्यांना एका सीसीटीव्ही चित्रणात वाझेंसोबत एक महिलाही दिसून आली. सोमवारी जप्त करण्यात आलेल्या दुचाकीची नोंदणी याच महिलेच्या नावे होती, अशी माहिती आहे.

The post सीसीटीव्हीत कैद झाल्या CSMTकडे जाताना सचिन वाझे यांच्या हालचाली appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/3usLTWI
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!