maharashtra

तळपायाची आग मस्तकाला गेलेल्या बच्चू कडूंनी खानसामाच्या कानशिलेत लगावली !

Share Now


अकोला – न्याय ताबडतोड अशा स्वभावामुळे अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू महाराष्ट्रात परिचीत आहेत. ते सर्वसामान्यांना होणाऱ्या अन्यायावर नेहमीच कणखर भूमिका घेताना दिसतात. ते यापूर्वी प्रशासकीय अधिकाऱ्याच्या अंगावर धावून गेल्याची घटना देखील घडली आहे. अशीच काहीशी घटना आता घडली असून त्यांनी अकोल्यात खानसामा अर्थात स्वयंपाक्याच्या कानशिलात लगावल्याचे समोर आले आहे.

कोरोनाबाधितांच्या जेवणासाठीच्या धान्यात मोठी अफरातफर झाल्याचे लक्षात आल्यानंतर पालकमंत्री बच्चू कडू यांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली आणि त्यांनी त्या स्वयंपाक्याला मारहाण केली. सोमवारी अकोल्यात बच्चू कडूंचा रुद्रावतार पहायला मिळाला. जिल्हा रुग्णालयातील स्वंयपाक घराला (मेस) बच्चू कडू यांनी भेट दिली. कडू यांना यावेळी मेसमधील डाळीच्या दैनंदिन वापरात अपहार होत असल्याचे लक्षात आले. त्यातूनच त्या स्वयंपाक्याच्या कानशिलात बच्चू कडू यांनी लगावली.

मेससंदर्भात एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानंतर पालकमंत्री बच्चू कडू यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मेसची पाहणी केली. यावेळी धान्यसाठ्याच्या पुरवठ्याची चौकशी केली असता आठ महिन्यांच्या धान्यसाठ्याची नोंद नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकारानंतर संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करून या प्रकरणाची चौकशी बसविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

The post तळपायाची आग मस्तकाला गेलेल्या बच्चू कडूंनी खानसामाच्या कानशिलेत लगावली ! appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/31OiGsL
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!