लंडन : ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनकाची कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर ब्रिटनमधील सात जणांना आपला जीव गमवावा लागल्याचे समोर आल्यानंतर या लसीचा आता लहान मुलांवर वापर करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. ऑक्सफर्डने ही माहिती मंगळवारी दिली असून या लसीच्या डोसनंतर काही लोकांच्या रक्तात गाठी झाल्याच्या शक्यतेवर आता संशोधन सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे.
या बाबत एक निवेदन ऑक्सफर्ड विद्यापीठाने प्रसिद्ध केले असून त्यामध्ये म्हटले आहे की, लहान मुलांवर या लसीचा वापर करण्यात येणार होता. या लसीचा डोस घेतल्यानंतर लोकांच्या रक्तात गाठी होत असल्याच्या बातमीमुळे अनेकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आता लहान मुलांच्यावरील करण्यात येणाऱ्या चाचणीला स्थगिती देण्यात आली आहे. ब्रिटनच्या मेडिकल रेग्युलेटर एजन्सीकडून त्यांनी केलेल्या अभ्यासाची अधिक माहिती कंपनीने मागवली आहे.
ब्रिटनमध्ये ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनकाची कोरोनाची लस घेतल्यानंतर चार दिवसापूर्वी सात जणांना आपला जीव गमवावा लागला होता. ही लस घेतल्यानंतर 30 जणांच्या शरीरात रक्ताच्या गाठी तयार झाल्या आणि त्यापैकी सात जणांना आपला जीव गमवावा लागला असल्याची माहिती ब्रिटनच्या मेडिकल रेग्युलेटर एजन्सीने दिली होती.
जागतिक आरोग्य संघटना, युरोपचे ड्रग रेग्युलेटर आणि एस्ट्राजेनेका यांनी स्वतः ही लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचे पुन्हा-पुन्हा सांगितले होते. रक्ताच्या गुठळ्या किंवा मेंदूतील रक्तस्त्राव होण्याचा धोका या लसीच्या वापरामुळे असल्याचा कोणताही पुरावा मिळालेला नाही. जागतिक आरोग्य संधटनेने देखील एस्ट्राजेनकाला क्लीन चिट देत सांगितले होते की, लस आणि रक्ताच्या गुठळ्या याचा कोणताही संबंध असलेली एकही केस आढळली नाही. फ्रान्स, स्पेन, इटली आणि जर्मनीने एस्ट्राजेनका लस वापरण्यास मनाई केली. या देशांनी असे म्हटले आहे की, लोकांनी लस घेतल्यानंतर रक्ताच्या गुठळ्या होत असल्याची तक्रार केली आहे. फ्रान्स, स्पेन, इटली आणि जर्मनीने एस्ट्राजेनेका लस वापरण्यास मनाई केली. या देशांनी असे म्हटले आहे की, लोकांनी लस घेतल्यानंतर रक्ताच्या गुठळ्या होत असल्याची तक्रार केली आहे.
The post ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनका लसीच्या लहान मुलांवर करण्यात येणाऱ्या चाचणीला ब्रिटनमध्ये स्थगिती appeared first on Majha Paper.
from Majha Paper https://ift.tt/3wCq88z
via IFTTT
Add Comment