maharashtra

ग्राहकांनी स्वतः मीटर रीडिंग पाठवून तसेच वीज बिल भरून महावितरणला सहकार्य करावे – ऊर्जामंत्री

Share Now


मुंबई – राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे ग्राहकांनी स्वतः मीटर रीडिंग पाठवून तसेच वीज बिल भरून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केले आहे. यावेळी त्यांनी महावितरण व्यवस्थापनाला वीज ग्राहकांच्या तक्रारी सोडवण्याला प्राधान्य देण्याचे आदेशही दिले आहेत. वीज बिल व थकबाकी यासंदर्भात बैठक मंत्रालय येथे पार पडली.

ऑनलाईन व मोबाईल अॅपद्वारे तक्रार करण्याची सोय ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरीदेखील जे ग्राहक याचा वापर करू शकत नाही त्यांच्यासाठी स्थानिक कार्यालयात ऑफलाईन तक्रारी नोंद करून घेण्याची व्यवस्था करा, असे निर्देश यावेळी त्यांनी दिले.

ग्राहकांनी कोरोना काळात रीडिंग न घेता बिलं पाठवण्याच्या तक्रारी केल्या आहेत. म्हणून शक्यतो मीटर रीडिंग घेऊनच वीज बिले पाठवावीत. कोरोनामुळे काही वेळा महावितरणला रीडिंग घेणे शक्य होत नसल्यामुळे ग्राहकांनी जर मोबाईल अॅपद्वारे रीडिंग पाठवले तर त्यांना रीडिंगनुसार बिल उपलब्ध करून देता येईल, असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.

वीजेचे दर कमी करण्याठी कसोशीने प्रयत्न करण्यात येत असून वीज खरेदी कराराचे पुनरावलोकन करण्यात येणार आहे. वीज खरेदीसाठी पॉवर एक्स्चेंजमधून दररोज साधारणतः ११०० ते १८०० मेगावॅट वीज विकत घेण्यात येते. पॉवर एक्स्चेंजसोबत दरासंबंधी वेळोवेळी वाटाघाटी करून स्वस्त वीज घेण्याचा प्रयत्न करण्याचे, निर्देश ऊर्जामंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

थकबाकी वसुलीसाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याच्या दुर्दैवी घटना घडत असून त्या खपवून घेतल्या जाणार नसल्याचे सांगत नितीन राऊत यांनी महावितरण व प्रशासन हे कर्मचाऱ्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले.

The post ग्राहकांनी स्वतः मीटर रीडिंग पाठवून तसेच वीज बिल भरून महावितरणला सहकार्य करावे – ऊर्जामंत्री appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/3rWtUpV
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!