maharashtra

अशा प्रकारे फेस ऑथेंटिकेशनद्वारे डाऊनलोड करु शकता आधार कार्ड

Share Now


नवी दिल्ली – सध्याच्या घडीला आधार कार्ड हे एक अत्यंत महत्त्वाचे दस्तावेज बनले असून त्याचा वापर हा सर्व ठिकाणी केला जातो. तुम्हाला अद्यावत तपशीलासोबत आधार कार्ड हवे असेल, तर यासाठी UIDAI ने एक नवीन फिचर आणले आहे. आधार कार्डचा वापर करणाऱ्या युजर्संना हे नवीन फिचर खूप फायदेशीर ठरणार आहे.

आधार कार्डच्या या नव्या फिचरचे नाव फेस ऑथेंटिकेशन असे आहे. म्हणजेच आता आधार कार्ड होल्डर व्यक्ती ऑनलाईन आपल्या चेहऱ्याच्या मदतीने आपले आधार कार्ड डाऊनलोड करू शकणार आहे. UIDAI च्या अधिकृत संकेतस्थळावर यासाठी जावे लागेल. फेस ऑथेंटिकेशन फीचर विना ओटीपी काम करते. तुम्हाला या फीचरचा वापर करण्यासाठी आधार केंद्रावर जाण्याची अजिबात गरज नाही. तुम्ही घरी बसून आपल्या लॅपटॉपवरून हे काम करू शकता.

अशा प्रकारे कराल या नव्या फिचरचा वापर

  • यूआयडीएआय uidai.gov.in च्या अधिकृत वेबसाईटवर सर्वप्रथम तुम्हाला जावे लागेल.
  • वेबसाईटच्या होमपेजवर Get Aadhaar Card हा पर्याय दिसेल, त्यावर तुम्ही क्लिक करा.
  • त्यानंतर तिथे face authentication हा पर्याय दिसेल.
  • आपला नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि कॅप्चा Face Authentication निवडण्यापूर्वी भरावा लागेल.
  • ऑथेंटिकेशन प्रक्रियेद्वारे तुम्हाला तुमचा चेहरा वेरिफाय करावा लागेल.
  • त्यानंतर ओकेवर क्लिक केल्यानंतर कॅमेरा सुरू होईल. आपला संपूर्ण चेहरा एका चौकटीत येईल अशा प्रकारे आपल्याला कॅमेरासमोर बसावे लागेल.
  • आपला फोटो कॅमेरा घेईल आणि ही प्रक्रिया येथेच संपेल. त्यानंतर तुम्ही आधार कार्ड डाऊनलोड करू शकता.

The post अशा प्रकारे फेस ऑथेंटिकेशनद्वारे डाऊनलोड करु शकता आधार कार्ड appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/2OrNHjg
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!