maharashtra

सचिन वाझेंच्या चौकशीसाठी सीबीआयला एनआयए विशेष न्यायालयाची परवानगी

Share Now


मुंबई – देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेले वाहन सापडल्याप्रकरणी अटकेत असलेले निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे. विशेष एनआयए न्यायालयात सचिन वाझे यांना हजर करण्यात आले असताना त्यांच्या एनआय कोठडीत ९ एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली. यावेळी न्यायालयाने सीबीआयला सचिन वाझे यांची चौकशी करण्यासाठी परवानगी दिली. चौकशी करण्यासाठी वेळेचे नियोजन करा, असे न्यायालयाने सीबीआयला सांगितले आहे.

सचिन वाझे यांच्याकडे अंबानी यांच्या घराजवळ एका स्कॉर्पिओ गाडीत स्फोटके आढळून आल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरूवातीला सोपवण्यात आला होता. पण, हे प्रकरण नंतर एनआयएकडे सोपवण्यात आले. स्फोटके प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच स्कॉर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आल्यानंतर प्रकरणाला नवीन वळण मिळाले होते. एनआयएकडून स्फोटके प्रकरणाचा तपास सुरू असताना मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास राज्य सरकारने एटीएसकडे सोपवला होता.

The post सचिन वाझेंच्या चौकशीसाठी सीबीआयला एनआयए विशेष न्यायालयाची परवानगी appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/3mpG2yo
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!