maharashtra

कोरोनामुळे जीव गमावणाऱ्या व्यक्तींबाबत संभाजी भिडे यांचे वादग्रस्त वक्तव्य

Share Now


सांगली – गेल्या काही दिवसांपासून देशासह राज्यात सातत्याने वाढत असलेल्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे चिंता वाढली आहे. त्यातच काही ठिकाणी वाढत्या कोरोनाबाधितांना आरोग्य सेवा पुरवताना शासन आणि प्रशानसनावर प्रचंड ताण येत आहे. कोरोनासमोर सरकारी यंत्रणा हतबल ठरत आहेत. वाढत्या रुग्णसंख्येसोबतच मृत्यूदराची भीती वाढत आहे. असे असतानाच कोरानाची साथ आणि कोरोनाबळींबाबत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

कोरोनाबाबत हे वक्तव्य संभाजी भिडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले आहे. ते म्हणाले की, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे सांगण्यात येत आहे. पण मुळात कोरोना हा रोगच नाही. कोरोना हा मानसिक आजार असून कोरोनामुळे जीव गमावणाऱ्या व्यकीत या जगण्याच्या लायकीच्या नाहीत. कोरोनाला रोखण्यासाठी निर्बंध लादणे हा मुर्खपणा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. संभाजी भिडे यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटले आहे.

The post कोरोनामुळे जीव गमावणाऱ्या व्यक्तींबाबत संभाजी भिडे यांचे वादग्रस्त वक्तव्य appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/3fTrDt1
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!