maharashtra

भाजपने दिले उन्नाव बलात्कार आरोपीच्या पत्नीला निवडणुकीचे तिकीट

Share Now


नवी दिल्ली – भाजपने उन्नाव बलात्कारातील आरोपी कुलदीप सेनगरच्या पत्नीला निवडणुकीचे तिकीट दिले आहे. भाजपच्या तिकीटीवर संगीता सेनगर उत्तर प्रदेशातील पंचायत निवडणूक लढवणार आहेत. उन्नाव जिल्हा पंचायतीचे संगीता सेनगर यांच्याकडे अध्यक्षपद होते. संगीता सेनगर फतेहपूर चौरासी त्रितयामधून निवडणूक लढणार आहेत.

कुलदीप सेनगर हे भाजप आमदार होते. बलात्कार प्रकरणात नाव आल्यानंतर पक्षाने त्यांची हकालपट्टी केली होती. उत्तर प्रदेश पंचायत निवडणूक चार टप्प्यांमध्ये पार पडणार आहे. पहिल्या टप्प्याला १५ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. तर निवडणुकीचे निकाल २ मे रोजी जाहीर केले जातील.

भाजपने गतवर्षी पक्षातून बडतर्फ केलेले कुलदीप सेनगर यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. न्यायालयाने सेनगर यांना उन्नाव बलात्कार पीडितेच्या वडिलांच्या मृत्यू प्रकरणात दोषी ठऱवत १० वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. तसेच १० लाखांचा दंडही ठोठावला होता. कुलदीप सेनगर यांचा यामध्ये आपला कोणताही सहभाग नसल्याचा दावा आहे. दरम्यान २०१७ मध्ये अल्पवयीन मुलीवर केलेल्या बलात्कार प्रकरणी न्यायालयाने कुलदीप सेनगर यांना आधीच जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

The post भाजपने दिले उन्नाव बलात्कार आरोपीच्या पत्नीला निवडणुकीचे तिकीट appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/39UqFcc
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!