maharashtra

सोशल मीडियावरील प्रात्यक्षिक परीक्षा पुढे ढकलल्याचे ‘ते’ परिपत्रक खोटे

Share Now


मुंबई – सोलापूरच्या डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नावाचा वापर करून प्रात्यक्षिक परीक्षा पुढे ढकलल्याचा समाजमाध्यमांवर व्हायरल झालेला संदेश आणि परिपत्रक खोटे असून त्यावर विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांनी केले आहे.

डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर यांच्या वतीने प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात नमूद केले आहे की, विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा पुढे ढकलली आहे, अशा आशयाचे कार्यालयीन परिपत्रक समाजमाध्यमांवर व्हायरल झालेले परिपत्रक हे खोटे आहे. विद्यार्थ्यांनी त्यावर विश्वास ठेवू नये. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्याद्वारे पूर्वघोषित वेळापत्रकानुसारच विद्यार्थ्यांची लेखी व तोंडी परीक्षा विहित वेळेनुसारच घेण्यात येणार असल्याचे अधिष्ठात्यांनी कळविले आहे.

The post सोशल मीडियावरील प्रात्यक्षिक परीक्षा पुढे ढकलल्याचे ‘ते’ परिपत्रक खोटे appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/3t7Kx3o
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!