maharashtra

पीएफधारकांनो अशी पूर्ण करा आपली केवायसी

Share Now

KYC
मुंबई : अनेकजण कर्मचारी भविष्य निर्वाहनिधी संस्थेच्या प्रक्रियेविषयी अनभिज्ञ असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. अनेकांना याबाबत पूर्ण माहिती नसल्याने आपला हक्काचा भविष्य निर्वाहनिधी काढण्यात अडचणी निर्माण होतात. पण योग्य वेळेस महत्त्वाची खबरदारी घेतल्यास पीएफविषयी दैनंदिन माहिती मिळवणे आपल्याला सोप होऊ शकते. तसेच हा निधी वेळ पडल्यास अगदी कमी वेळेत उपलब्धही होऊ शकतो.

आपल्यापैकी साधारणपणे 50 टक्के लोक असे आहेत आपल्या पीएफ खात्याच्या ज्यांनी केवायसी (KYC) पूर्ण केलेल्या नसतात. आपल्या ओळखीची निश्चिती करणारी माहिती केवायसीमध्ये द्यावी लागते. पीएफ यूनिवर्सल अकाउंट नंबरला ती जोडलेली असते. पीएफ खातेधारकाने असे न केल्यास नियमितपणे पीएफची माहिती व स्थितीचे अपडेट मिळत नाही. पण ही प्रकिया पूर्ण केलेली असेल, तर या सेवांचा वापर करता येतो.

केवायसी पूर्ण करण्याची कवायत मागील काही वर्षांपासून सुरु आहे. ईपीएफओच्या अखत्यारीत असलेल्या सर्व कंपन्यांना सरकारने आपल्याकडील 100 टक्के कर्मचाऱ्यांच्या यूएएन आणि केवायसीला संलग्न करण्याचे निर्देश दिले आहेत. हे करणे अनिवार्य असून असे न करणे दंडात्मक गुन्हा ठरवण्यात आले आहे.

ज्या खात्यांची केवायसी कागदपत्रांची पूर्तता झाली आहे, त्या खातेधारकांना पीएफच्या व्यवहारांमध्ये कोणतीही अडचण येणार नाही. पण ही माहिती अद्ययावत आणि संलग्न केली नाही, तर मात्र ‘क्लेम रिक्वेस्ट’ नाकारलीही जाऊ शकते. तसेच पीएफ खात्याच्या कोणत्याही व्यवहाराची माहिती एसएमएसद्वारे मिळणार नाही.

ईपीएफ सदस्याला केवायसी संबंधित कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी कोठेही जाण्याची गरज नाही. खातेधारकाला ईपीएफओ यूएएन पोर्टल https://ift.tt/2l8mi4m वर जाऊन आपल्या केवायसी संबंधित कागदपत्रांची माहिती अद्ययावत करता येईल. सर्वात आधी पोर्टलवर जाऊन केवायसीचा पर्याय निवडायचा. तेथे पॅन क्रमांक, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक, बँक खाते याची माहिती भरायची. यानंतर आपले पॅन आणि आधार पीएफ खात्याशी संलग्न होईल. पण संबंधित माहिती नोकरी देणाऱ्या कंपनीकडून तपासून खातरजमा होणे अत्यावश्यक आहे. कंपनीकडून खातरजमा होताच खातेधारकाला ईपीएफओच्या सर्व सुविधांचा उपयोग करता येईल.

केवायसी पूर्ण असल्यास ऑनलाइन क्लेम सेटलमेंटनंतर 3 दिवसांमध्येच आपल्याला पैसे काढता येतील. अर्जानंतर ईपीएफओ आपली पीएफ काढण्याची प्रक्रिया तत्काळ सुरु करते. त्यानंतर पीएफचे पैसे थेट आपल्या खात्यात जमा होतात.

The post पीएफधारकांनो अशी पूर्ण करा आपली केवायसी appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/2OCp2IZ
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!