maharashtra

नियमित व्यायामाचे महत्त्व

Share Now

कोण किती व्यायाम करतो यापेक्षा किती नियमितपणे करतो हे अधिक महत्त्वाचे आहे. स्वतःच्या लग्नाच्या दिवशी व्यायामाचे वेळापत्रक काटेकोरपणे सांभाळून हॉलवर जायला थोडा उशिर करणारे एक गृहस्थ बघण्यात आहेत. जास्त व्यायाम करून शरीर पिळदार दिसते खरे पण अशा पीळदार शरीरयष्टीवाल्यांची रोगप्रतिकार शक्ती तोलामोलाची असते. त्यांची बौद्धिक क्षमता बेताची असते.

लहानशा अपघाताने हाड मोडल्याची उदाहरणे आपल्याला अनेकवेळा बघायला मिळतात. शास्त्रीय दृष्टीकोनातून याचे कारण म्हणजे जास्त व्यायामामुळे आहारापासून मिळणारे सर्व पोषक घटक फक्त मांसधातूच्या पोषणासाठी वापरले जातात. परिणामी शरीरातील इतर यंत्रणा कमजोर राहते.

थोडा पण नियमित व्यायाम करणारे दिसायला भले पीळदार दिसणार नाहीत, पण अशा पहेलवानांपेक्षा नक्कीच सर्व बाबतीत वरचढ असतात. नियमित व्यायाम करण्यामुळे शरीराचे स्नायू सुदृढ आणि बलवान होतात तसेच बुद्धीच्या बाबतीत पण समजले पाहिजे. 

शारीरिक व्यायाम करतेवेळी विशिष्ट अवयवांची हालचाल ठराविक प्रकारे अनेक वेळा केली जाते. त्यामुळे ते ते स्नायू बळकट होतात. बुद्धीच्या योग्य विकासासाठी हाच नियम पाळला पाहिजेत. समजलेला विषय पुन्हा पुन्हा वाचावा म्हणजे तो कधीही न विसरण्याइतका पक्का होतो. यालाच बुद्धीचा व्यायामही म्हणता येईल.

 

The post नियमित व्यायामाचे महत्त्व appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/3t9bkMu
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!