maharashtra

राज्यात काल दिवसभरात 55 हजार 411 नव्या रुग्णांची नोंद

Share Now


मुंबई – राज्यात कोरोनाबाधितांची वाढती आकडेवारी कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. त्यात राज्याला शनिवारी मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यात काल (शनिवारी) तब्बल 53 हजार रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर राज्यात काल दिवसभरात 55 हजार 411 नवीन रुग्णांची नोंद झाली. कालपर्यंत राज्यात एकूण 27,48,153 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असल्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 82.18 % एवढे झाले आहे.

काल राज्यात 309 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यदूर 1.72% एवढा आहे. कालपर्यंत तपासण्यात आलेल्या 2,18,51,235 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 33,43,951 (15.3 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 30,41,080 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर 25,297 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. मुंबई महानगरपलिका क्षेत्रात काल 9330 रुग्णांची नोंद झाली आहे.

The post राज्यात काल दिवसभरात 55 हजार 411 नव्या रुग्णांची नोंद appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/3dU8vZj
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!