maharashtra

लिपस्टीक वापरताय? जरा काळजी घ्या

Share Now

बाजारात उपलब्ध असलेल्या विविध प्रकारच्या लिपस्टीकमध्ये शिसासारख्या विषारी धातूचे प्रमाण चिंताजनक असल्याचे प्रयोगशाळेत करण्यात आलेल्या तपासणीतून उघडकीस आले आहे. यात २२ नामवंत लिपस्टीक ब्रँडचाही समावेश आहे.

बोस्टन लेड पॉयझनिंग प्रिव्हेन्शन प्रोग्रॅमच्या खाली या तपासण्या केल्या गेल्या. संस्थेचे वैद्यकीय संचालक डॉ.सीन पालफ्रे या विषयी माहिती देताना म्हणाले की लिपस्टीकसारखी सौदर्यप्रसाधने वापरताना ती पूर्ण सुरक्षित हवीत यात संशय नाही. लिपस्टीक लावलेल्या ओठावरून अनेक वेळा जीभ फिरविली जाते त्यामुळे लिपस्टीकचा अंश पोटात जात असतो. यात वापरण्यात येणार्यात शिशाची पातळी धोकादायक असून त्यामुळे मानसिक आरोग्याला धोका निर्माण होतो. याचा थेट परिणाम बुद्धी आणि स्मरणशक्तीवर होतो. परिणामी बुद्धांक कमी होतो आणि तरूण वयातील मुलींमध्ये शिकण्याची क्षमताही घटू शकते. गरोदर महिलांनी असल्या लिपस्टीक वापरल्या तर त्याचा परिणाम गर्भातील बाळावर होतो.

शिसे हा विषारी धातू आहे मात्र त्याचे लिपस्टीक मधील प्रमाण किती असावे यावर अन्न औषध विभागाचे नियंत्रण नाही तर हे नियंत्रण संबंधित कंपन्यांवरच आहे. त्यामुळे किती प्रमाणात शिसे वापरले जाते हे त्या उत्पादकांवर अवलंबून असते. शिशाचे प्रमाण जाणून बुजून वाढवले जात नसले तरी ज्या खनिजांपासून लिपस्टीकचे विविध रंग तयार होतात त्यात शिसे असतेच. आज लिपस्टीकच्या ४०० लोकप्रिय शेडस बाजारात आहेत. लोरियाल, मेबेलिन, कव्हर गर्ल्स, नार्स, स्ट्रगेझर या नामवंत कंपन्या पहिल्या दहा नंबरच्या उत्पादकात आहेत मात्र त्यांच्याही लिपस्टीकमध्ये शिसे धोकादायक पातळीत आहे असेही पालफ्रे यांना तपासणीत आढळून आले आहे.

The post लिपस्टीक वापरताय? जरा काळजी घ्या appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/2Qj9hqY
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!