maharashtra

चुकीचे स्पेलिंग सर्वात सेफ पासवर्ड

Share Now

password

आपला पासवर्ड चोरला जाऊ नये अथवा सहजतेने तो हॅक करता येऊ नये अशी प्रत्येकाची इच्छा असली तरी पासवर्ड लक्षात ठेवणे हे कटकटीचे काम असते. त्यामुळे बरेचवेळा आपले नांव, जन्मतारीख, गावाचे नांव, जन्मस्थळाचे ठिकाण, टोपणनावे अशा स्वरूपाचे पासवर्ड निवडले जातात.  पासवर्ड अधिक सुरक्षित बनविण्यासाठी त्यात अनेक चिन्हांचा, आकड्यांचा वापर केलेला असावा आणि पासवर्ड मोठा असावा असे सल्लेही  जाणकारांनी दिले आहेत. मात्र आता नव्या संशोधनातून असे आढळले आहे की सुरक्षित पासवर्ड शोधणे अगदी सोपे असते. म्हणजे तुमचे व्याकरण थोडे कच्चे असेल आणि स्पेलिंगही तुम्ही चुकीची करत असाल तर त्यापासून बनलेले पासवर्ड अधिक सुरक्षित ठरतात.

कार्नेजी विद्यापीठातील संशोधक अश्विनी राव या पासवर्ड क्रॅकींग सिस्टीममध्ये तज्ञ आहेत. त्या म्हणतात, मोठी वाक्ये अथवा मोठी नांवे पासवर्ड म्हणून वापरली गेली असतील तर ती सरावाने सहज गेस करता येतात. म्हणी, वाकप्रचारही सहज गेस केले जातात. पोस्टाचा पत्ता, ई मेल अॅड्रेस हेही पासवर्ड म्हणून सुरक्षित नाहीत. त्याऐवजी अशुद्ध व्याकरण आणि चुकीचे स्पेलिंग केले गेले असेल तर ते मात्र सहजासहजी गेस करता येत नाही. साधारणपणे हॅकर कुणाचाही पासवर्ड शोधताना योग्य व्याकरण आणि स्पेलिंगचाच जास्त सर्च करतात आणि त्यासाठी डिक्शनरी पुरेशी असते. मात्र चुकीचे स्पेलिंग असेल तर ते शोधणे मात्र कर्मकठीण असते.

आपले पासवर्ड सुरक्षित राहावेत यासाठी ईमेल, बँक अकौंट अशा विविध ठिकाणी जेथे पासवर्डची गरज आहे तेथे वेगवेगळे पासवर्ड असावेत. ईमेल पासवर्ड म्हणून कधीच वापरू नये किवा युजरनेम आणि पासवर्ड हे कॉबिनेशन एकच नको. विशेषतः एन्टरटेनमेंट साईट, सोशल साईट, आर्थिक व्यवहार याबाबत तर विशेष काळजी घ्यायला हवी. मात्र चुकीचे स्पेलिंग आणि चुकीचे व्याकरण हे पासवर्ड तुलनेने अधिक सुरक्षित ठरतात. त्यासाठी काळजी एकच घ्यावी लागते ती म्हणजे आपण चुकीचे स्पेलिंग नक्की कसे केले आहे ते लक्षात ठेवावे लागते इतकेच.

The post चुकीचे स्पेलिंग सर्वात सेफ पासवर्ड appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/2RpBOLY
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!