maharashtra

अनेक आजारांवर गुणकारी सफरचंद

Share Now

apples

जुलै ऑगस्ट महिने म्हणजे सफरचंदाचा हंगाम. गोड, रसाळ आणि आकर्षक लाल रंगाची सफरचंदे बाजारात या काळात मुबलक उपलब्ध असतात. हे फळ अनेक गुणांनी युक्त असून ते सर्व वयोगटातील लोकांना फायदेशीर ठरते.

सफरचंदपासून अनेक आयुर्वेदिक औषधे तयार होतात. ते पित्तनाशक, वातनाशक, शीतल, जड, हृदयासाठी हितावह, वीर्यवर्धक आणि पोट व मूत्रपिंड साफ राखणारे आहे. त्यामध्ये आयर्न, प्रोटीन, कॅल्शियम, शर्करा व बी गटातील व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणात आहेत. कार्बोहायड्रेटचे एक रूप पेक्टीनही यात भरपूर आढळते. मूतखड्याच्या रोग्यांनी रोज पूर्णपणे पिकलेली चार-पाच सफरचंद खावीत. लिव्हरच्या रोग्यांनी जेवणापूर्वी प्रत्येकवेळी दोन ताजी सफरचंद खावीत वा सफरचंदाचा चहा प्यावा. तापात रोग्याला तहान, जळजळ, थकवा, व बैचेनी होत असेल तर सफरचंदाचा चहा वा त्या सफरचंदाचा रस पाजावा. घशात जखम, व्रण असेल वा गिळायला त्रास होत असेल तर उत्तम ताज्या सफरचंदाचा रस घशापर्यंत नेऊन काही वेळ तेथे अडवून ठेवावा. यामुळे आश्चर्यजनक फायदा होतो.

मेंदूचा अशक्तपणा दूर करण्यासाठी रोज एक सफरचंद खावे तसेच दुपारच्या वा रात्रीच्या जेवणात कच्च्या सफरचंदाची भाजी खावी. सायंकाळी ग्लासभर सफरचंदाचा रस प्यावा व रात्री झोपण्यापूर्वी एक पिकलेले गोड सफरचंद खावे. यामुळे महिन्याभरातच फरक दिसू लागतो. जुनाट खोकला असेल तर पिकलेल्या सफरचंदाच्या ग्लासभर रसात खडीसाखर मिसळून रोज सकाळी नियमित प्यायल्यास जुनाट खोकलाही बंद होतो. बध्दकोष्ठता नष्ट करण्यासाठी रोज सकाळी रिकाम्या पोटी दोन सफरचंद चावून खावीत यामुळे अग्निमांश नष्ट होऊन भूक वाढते. पोटात गॅस असेल तर गोड सफरचंदात १० ग्रॅम लवंगा टोचून ठेवाव्यात व दहा दिवसांनी लवंगा काढून तीन लवंगा व एक गोड सफरचंद खाण्यास द्यावे. या दरम्यान तांदूळ व तांदळाचे पदार्थ रोग्यास खाण्यास देऊ नये.

The post अनेक आजारांवर गुणकारी सफरचंद appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/3seTw1y
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!