maharashtra

सॉफ्ट ड्रिंक्स पिताय – मग हे वाचाच

Share Now

drinks

स्वीट सोडा, स्पोर्टस ड्रिंक्स, फ्रूट ड्रिंक्स अशी साखरेचा वापर असलेली पेये पिण्यामुळे जगात दरवर्षी १ लाख ८० हजार व्यक्ती मृत्यूमुखी पडतात असे संशोधनात दिसून आले आहे. अमेरिकन हार्ट असोसिएशन, एपिडेमॉलॉजी अॅन्ड प्रिव्हेन्शन, न्यूट्रीशन, फिजिकल अॅक्टीव्हीटी, मेटॅबोलिझम २०१३ या अंतर्गत हे संशोधन केले गेले. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर डेटा गेाळा करण्यात आला होता.

यात असे दिसून आले की या पेयांत साखर मोठ्या प्रमाणावर वापरली जात असल्याने मधुमेहाची शक्यता अनेक पटींनी वाढते, हृदयाशी संबंधित विकार वाढतात तसेच कांही प्रकारचे कॅन्सरही होतात. साखरेमुळे वजन वाढते व त्यामुळेच हे सर्व विकार होण्याचे प्रमाणही वाढते असे संशोधकांचे म्हणणे आहे.

एका वर्षात या पेयांच्या सेवनामुळे १ लाख ३३ हजार जण मधुमेहामुळे मृत्युमुखी पडले तर ४४००० जण हृदयांच्या विकारामुळे तर ११ हजार जणांना कॅन्सरमुळे प्राण गमवावे लागले असल्याचे ग्लोबल बर्डन ऑफ डिसिजेस स्टडीने गोळा केलेल्या डेटातून सिद्ध झाले आहे. त्यात कमी व मध्यम उत्पन्न गटातील देशांतील नागरिकांचा समावेश होता तसेच वयानुसार व लिगानुसार या पेयांचा वजनवाढीवर काय परिणाम होतो हेही त्यातून तपासले गेले.

यातील निष्कर्षांनुसार लॅटिन अमेरिका आणि कॅरिबिअन मध्ये अशी पेये पिणाऱ्यात मधुमेहामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या अधिक असल्याचे जाणवले तर युरेशियामध्ये हृदयाच्या विकारांमुळे मरणाऱ्याचे प्रमाण अधिक होते. सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या १५ देशांपैकी मेक्सिको येथे या पेयांचे सेवन सर्वाधिक केले जाते व त्यामुळे मृत्यू प्रमाणही अधिक असल्याचे दिसून आले तर जपान मध्ये या पेयांचे सेवन सर्वात कमी केले जाते व त्यामुळे मृत्युमुखी पडणाऱ्याचे प्रमाणही सर्वात कमी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

The post सॉफ्ट ड्रिंक्स पिताय – मग हे वाचाच appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/3dS60Hd
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!