maharashtra

पंजाबच्या कोरोना लसीकरण मोहिमेचा अभिनेता सोनू सूद ब्रँड अँम्बेसेडर

Share Now


एकीकडे कोरोनाची दुसरी लाट देशात थैमान घालत असताना लसीकरण हा एकमेव पर्याय ही लाट थोपवण्यासाठी भारतासमोर आहे. देशात कोरोना लसीकरण मोहिम सुरु आहे. देशातील बऱ्याच नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. तर काही नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे.

दरम्यान देशात असे बरेच नागरिक आहेत, जे अद्याप लस घेण्यास घाबरत आहेत. त्यांच्या मनात लसीबाबत अनेक शंका आहेत. अशा परिस्थितीत 45 वर्षांवरील लोकांना कोराना लसीकरणासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. पंजाब सरकारने कोरोना लसीकरण मोहिमेसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. पंजाबने अभिनेता सोनू सूदला कोरोना लसीकरण मोहिमेचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनवले आहे. ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनल्यानंतर मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी त्यांचे अभिनंदन केले.


मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी ट्विटरच्या माध्यमातून अभिनंदन करताना म्हटले की, पंजाब सरकारने अभिनेता सोनू सूद यांची कोरोना लसीकरण मोहिमेसाठी ब्रँड अँम्बेसेडर म्हणून निवड केली आहे. याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. सोनू सूद ब्रँड अ‍ॅम्बेसेडर झाल्यामुळे कोरोना लसीकरणाबद्दल अधिक जागरुकता लोकांमध्ये निर्माण होईल. मी राज्यातील सर्व लोकांना आवाहन करतो की त्यांनी लसीकरण लवकरात लवकर करावे.

The post पंजाबच्या कोरोना लसीकरण मोहिमेचा अभिनेता सोनू सूद ब्रँड अँम्बेसेडर appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/3wL5MtT
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!