maharashtra

सर्वोच्च न्यायालयालाही कोरोनाचा फटका; ५० टक्के कर्मचारी कोरोनाबाधित

Share Now


नवी दिल्ली – कोरोनाचा देशात सुरु असलेला कहर कमी होण्याचे नाव घेत नसून याचा मोठा फटका सर्वोच्च न्यायालयालाही बसला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे ५० टक्के कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. सर्वोच्च न्यायालयातील सूत्रांच्या हवाल्याने एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, कर्मचारी कोरोनाबाधित असल्यामुळे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश घरातूनच व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणी घेणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा संपूर्ण परिसर सॅनिटाइज करण्यात येत आहे. अनेक खडंपीठ एक तास उशीरा सुनावणी घेणार आहेत.

एनडीटीव्हीला एका न्यायाधीशाने दिलेल्या माहितीनुसार, माझे अनेक कर्मचारी कोरोनाबाधित झाले आहेत. काही न्यायाधीशांनाही कोरोनाची लागण झाली होती. पण त्यातून ते लवकर बरे झाले आहेत. सर्वोच्च न्यायालयातील कर्मचारी कोरोनाबाधित झाल्याचा परिणाम सुनावणीवरही झाला आहे. सकाळी १०.३० वाजता होणारी सुनावणी सर्व खंडपीठांकडून एक तास उशिराने सुरु होणार आहे. तर ११ वाजता होणारी सुनावणी १२ वाजता सुरु होईल अशी माहिती अतिरिक्त निबंधकांनी दिली आहे.

The post सर्वोच्च न्यायालयालाही कोरोनाचा फटका; ५० टक्के कर्मचारी कोरोनाबाधित appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/3s5ChiR
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!