maharashtra

सचिन वाझेंचे सहकारी एपीआय रियाझुद्दीन काझी यांचे निलंबन

Share Now


मुंबई : एनआयएने उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटके आढळल्याप्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझेंना अटक केल्यानंतर काल मुंबई पोलिस सेवेतून एपीआय रियाजुद्दीन काझी यांना निलंबित करण्यात आले. काझी यांची अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरण हत्या प्रकरणात महत्वाची भूमिका असल्याचा आरोप आहे. या प्रकरणात त्यांच्यावर एनआयएने पुरावे मिटवणे, प्रकरणाची माहिती असून देखील सहकार्य केल्याचा आरोप केला आहे.

2010 साली एमपीएससीमधून एपीआय रियाझुद्दीन काझी हे भरती झाले होते. त्यांची पहिली पोस्टिंग वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये पीएसआयच्या पोस्टवर झाली. जेथे त्यांनी प्रोबेशन पीरियडवर काम केले. वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये काही वर्षे काम केल्यावर त्यांची अँटी चेन स्नॅचिंग स्कॉडमध्ये बदली झाली. त्यानंतर रियाझुद्दीन यांना सीआययूमध्ये पाठवण्यात आले. मात्र अँटिलिया प्रकरणात नाव अल्यानंतर त्यांची सीआययूमधून बदली करण्यात आली.

एनआयएच्या सूत्रांनी दिलेल्या माहितानुसार सचिन वाझे यांनी केलेल्या सर्व गुन्ह्यांची एपीआय रियाझुद्दीन काझी यांना माहिती होती आणि त्यांची अटक महत्त्वाची असल्याचे सांगितले जात आहे.

काझी यांनी 26 फेब्रुवारी रोजी अँटिलिया स्फोटक प्रकरणातील तपासाचा हवाला देत ठाणे येथे असलेल्या साकेत सोसायटीत जाऊन तेथील सीसीटीव्ही फुटेज आपल्या ताब्यात घेतले होते आणि ते मिटवले होते. मनसुख हिरेनची स्कॉर्पिओ गाडी विक्रोळीहून घेतल्यानंतर ती साकेत सोसायटीत 17 फेब्रुवारी रोजी आणण्यात आली होती. हीच गोष्ट तपास यंत्रणांना लक्षात येऊ नये म्हणून तेथील सोसायटीतील सीसीटीव्ही फुटेज मिटवण्यात आले. एवढेच नाही तर पंचममध्येही डीव्हीआरचा उल्लेख नव्हता. साकेत सोसायटीच्या लोकांनी त्यांच्या स्थानिक पोलिस ठाण्यात ही माहिती दिली, तेव्हा ही बाब उघडकीस आली.

साकेत सोसायटीचे डीव्हीआर काझी यांनी घेतल्यानंतर ठाण्यात असलेल्या मनसुखच्या कार्यालयाजवळील नंबर प्लेट बनवणाऱ्या दुकानातील डीव्हीआर देखील ताब्यात घेतले. त्यानंतर विक्रोळीच्या कन्नमवार नगर भागात असलेल्या बंटी रेडियम शॉपवर गेले आणि त्या दुकानातील डीव्हीआरही रियाझुद्दीन काझी यांनी ताब्यात घेतले. त्यानंतर एनआयएने तपासादरम्यान मिठी नदीत शोध घेतला असता तेथे अनेक डीव्हीआर, एक लॅपटॉप व सीपीयू जप्त करण्यात आले, असे सांगितले जात आहे. रियाझुद्दीन काझी यांनी डीव्हीआर ताब्यात घेतले आणि आणि नंतर ते नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता.

एनआयएच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, एटीएसकडून ही केस ताब्यात घेताना माहिती मिळाली की, 6 मार्च रोजी सचिन वाझे आणि रियाझुद्दीन काझी ऑडी गाडीत बसून मुंबईच्या नागपाडा भागात गेले होते. नागपाडा येथे जाताना दोघांनी एका व्यक्तीची भेट घेतली, जो वाझे यांच्या ओळखीचा होता. या व्यक्तीकडून त्यांनी पेट्रोल व हातोडा घेतला होता.

The post सचिन वाझेंचे सहकारी एपीआय रियाझुद्दीन काझी यांचे निलंबन appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/3wL0kY2
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!