maharashtra

महाकुंभमेळ्यातील दुसऱ्या शाहीस्नानानंतर १०२ साधू व भाविक कोरोनाबाधित

Share Now


हरिद्वार – देशात कोरोना महामारीने हाहाकार उडवलेला असताना त्या चिंतेत आता आणखी एक भर टाकणारी माहिती समोर आली आहे. हरिद्वारमध्ये होत असलेल्या महाकुंभमेळ्यात दुसऱ्या शाहीस्नानानंतर १०२ साधू व भाविकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. कुंभमेळ्याच्या बाराव्या दिवशी दुसरे शाही स्नान पार पडले. साधूंसह भाविकांनी पवित्र स्नानासाठी अलोट गर्दी केली होती. तर दुसरीकडे कोरोना नियमांची कुंभमेळ्यात अंमलबजावणी करताना प्रशासन हतबल झाले आहे.

कोरोनाची दुसरी लाट देशात आलेली असतानाच हरिद्वारमध्ये कुंभमेळा होत असून, कोरोना नियमांची प्रचंड गर्दीत अंमलबजावणी करताना प्रशासनाची तारांबळ होत आहे. कुंभमेळ्यातील सोमवारी शाहीस्नान पार पडले. गंगेतील दुसऱ्या पवित्र स्नानाची पर्वणी साधण्यासाठी हरिद्वारमध्ये तब्बल २८ लाख साधू आणि भाविक दाखल झाले होते. उत्तराखंडच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी रात्री ११.३० ते सोमवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत १८ हजार १६९ भाविकांची चाचण्या करण्यात आल्या. यात १०२ साधू आणि भाविक कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे.

कुंभमेळा सुरू असलेल्या परिसरात कोरोना नियमांच्या पालनाबद्दलची पाहणी इंडियन एक्स्प्रेसने केली. तेव्हा तिथे कुठेही मास्कची सक्ती असल्याचे आढळून आले नाही. रेल्वे स्टेशन आणि इतर चेक पॉईंटच्या ठिकाणी थर्मल स्क्रिनिंगही केले जात नसल्याचे चित्र दिसले. विशेष म्हणजे कुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी आरटी-पीसीआरचा निगेटिव्ह रिपोर्ट सक्तीचा करण्यात आलेला नाही. पण, विविध तपासणी नाक्यांवर केलेल्या पाहणी रिपोर्ट न आणलेल्यांनाही परवानगी देण्यात आल्याचे चित्र दिसून आले. दरम्यान पहिल्या शाहीस्नानाला ३२ लाख भाविक हरिद्वारमध्ये दाखल झाले होते. तर बुधवारी तिसरे शाहीस्नान होणार आहे.

The post महाकुंभमेळ्यातील दुसऱ्या शाहीस्नानानंतर १०२ साधू व भाविक कोरोनाबाधित appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/3uP3qZ4
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!