maharashtra

नववर्षाचे औचित्य साधत आव्हाडांची मोठी घोषणा! महिलांसाठी उभारणार प्रशस्त वसतीगृह

Share Now


मुंबई : नववर्षाचे औचित्य साधत राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. म्हाडाच्या माध्यमातून राज्य सरकारकडून सामाजिक उपक्रमाला हात घालण्यात येत असल्याचे आव्हाड यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेनुसार 1 हजार महिलांसाठी म्हाडाच्या माध्यमातून प्रशस्त वसतीगृह सुरू करण्यात येणार असल्याचे आव्हाड यांनी म्हटले आहे.

आर्थिक राजधानी मुंबईत राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक महिला कामानिमित्ताने येत असतात. मुंबईत आल्यानंतर त्यांच्या राहण्याची अडचण होते. त्यामुळे ताडदेवला म्हाडाच्या खुल्या भूखंडामध्ये हे वसतीगृह तयार करण्यात येणार आहे. साधारण 500 खोल्यांचे हे वसतीगृह असणार आहे. प्रत्येक खोलीत 2 महिला राहू शकतील अशी व्यवस्था उभारण्यात येणार आहे. सर्व सुविधायुक्त वसतीगृह असणार आहे. मुंबई बाहेरच्या महिलांना याचा नक्कीच फायदा होणार आहे.

The post नववर्षाचे औचित्य साधत आव्हाडांची मोठी घोषणा! महिलांसाठी उभारणार प्रशस्त वसतीगृह appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/3tf2f51
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!