maharashtra

डेव्हिड वॉर्नरला मागे टाकत रोहित शर्माचा विक्रम

Share Now


मुंबई : राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यातील रोमहर्षक सामन्यानंतर आता मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स या सामन्याकडून चाहत्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. मुंबई इंडियन्सने परंपरेनुसार पहिला सामना देवाला दान केल्यानंतर त्यांच्याकडून आजच्या सामन्यात चाहत्यांना विजय हवाच आहे. दुसरीकडे कोलकाता नाईट रायडर्स विजयी लय कायम राखण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय कोलकाता नाईट रायडर्सने घेतला आहे.

दरम्यान रोहितने या सामन्यात १६वी धाव घेताच आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीमध्ये चौथे स्थान पटकावले. त्याने सनरायझर्स हैद्राबादच्या डेव्हिड वॉर्नरला मागे टाकले आहे. या यादीत ५९११ धावांसह विराट कोहली पहिल्या स्थानावर, ५४२२ धावांसह सुरेश रैना दुसऱ्या स्थानावर, ५२८२, धावांसह शिखर धवन तिसऱ्या स्थानावर, ५२६५* धावांसह रोहित शर्मा चौथ्या तर ५२५७ धावांसह डेव्हिड वॉर्नर पाचव्या स्थानावर आहे. पण यात विशेष म्हणजे पहिल्या चारमध्ये भारतीय फलंदाजांचा दबदबा आहे.

कोलकाता नाईट रायडर्सने त्यांच्या ताफ्यात एकही बदल केलेला नाही, तर मुंबई इंडियन्सचा सलामीवीर क्विंटन डी कॉक माघारी परतला आहे त्यामुळे मागच्या सामन्यात ४९ धावा करणाऱ्या ख्रिस लीनला बाकावर बसावे लागले आहे. पण, क्विंटनला (२) फार कमाल दाखवता आली नाही.

वरूण चक्रवर्थीने दुसऱ्याच षटकात त्याला राहुल त्रिपाठीकरवी झेलबाद करून माघारी पाठवले. पण, त्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादवने जराही दडपण न घेता आक्रमक खेळ केला. हरभजन सिंगच्या एका षटकात त्याने तीन खणखणीत चौकार खेचले आणि संघावरील दडपण कमी केलं. कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार इयॉन मॉर्गनने पहिल्या पॉवर प्लेमध्ये त्याच्या तीनही प्रमुख फिरकी गोलंदाजांना पाचारण केले.

The post डेव्हिड वॉर्नरला मागे टाकत रोहित शर्माचा विक्रम appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/3wOInYC
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!