maharashtra

पुणे महापालिका आयुक्त अॅक्शन मोडमध्ये! 2 रुग्णालयातील 50 बेडस् घेतले तातडीने ताब्यात

Share Now


पुणे : पुणे शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना उपचारासाठी बेडस्ची संख्या वाढविण्यासाठी पुणे महापालिका सातत्याने प्रयत्न करत आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी आज तर चक्क दोन खाजगी रुग्णालयांना भेट देऊन तात्काळ ५० बेडस् ताब्यात घेण्याची प्रक्रिया पार पाडली.

पुणे शहरातील कोरोनाबाधितांची अ‍ॅक्टिव्ह संख्या ५० हजारांच्या पुढे गेली आहे. सुमारे ५ हजार रुग्ण ऑक्सीजनवर तर एक हजारांहून अधिक रुग्ण व्हेंटीलेटवर आहेत. यासोबतच होम क्वारंटाईन असलेल्या रुग्णांची प्रकृती खालावल्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याची मागणीही वाढली आहे.

पुणे महापालिकेने या पार्श्‍वभूमीवर सीओईपी सेंटरमध्ये ६२५ रुग्णांवर उपचारासाठी सुविधा निर्माण केली आहे. ईएसआय हॉस्पीटलसह लष्कराच्या रुग्णालयातील बेडसही ताब्यात घेतले आहेत. यासोबतच खाजगी रुग्णालयांतील बेडस् ताब्यात घेण्याची प्रक्रिया वेगाने राबविली जात आहे. आजमितीला शहरातील जवळपास साडेसात हजारांहून अधिक बेडस्वर कोव्हिड रुग्णांवर उपचार सुरू असून यामध्ये जिल्ह्यातून व बाहेरून येणाऱ्या रुग्णांची संख्याही अधिक आहे. सौम्य लक्षणे असलेल्या परंतू विलगीकरणाची सुविधा नसलेल्या नागरिकांसाठीही चार विलगीकरण कक्षांमध्ये साडेबारांशेहून अधिक बेडस्ची सुविधा निर्माण करण्यात आलेली आहे.

पण, कोरोनाबाधितांच्या वाढीचा आणि त्यातही गंभीर रुग्ण वाढीचा दर पाहाता महापालिकेने खाजगी रुग्णालयातील अधिकाअधिक बेडस् उपलब्ध करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. कोरोनासाठी अतिरिक्त बेडस् उपलब्ध करून देण्यास खालील अधिकाऱ्यांना दाद न देणाऱ्या खाजगी रुग्णालयांना अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल भेट देऊन बेड ताब्यात घेत आहेत.

तर आयुक्त विक्रम कुमार यांनी आज खराडी एशिया कोलंबिया आणि औंध येथील मेडीपॉईंट रुग्णालयाला भेट देउन तेथील ५० हून अधिक बेडस् तातडीने ताब्यात घेतले. या दोन्ही ठिकाणी सुमारे ५० ऑक्सीजन बेडस् असून त्यापैकी पाच ते सहा व्हेंटीलेटर बेडस आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

The post पुणे महापालिका आयुक्त अॅक्शन मोडमध्ये! 2 रुग्णालयातील 50 बेडस् घेतले तातडीने ताब्यात appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/2QoZu2g
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!