maharashtra

एनआयएने केला पोलीस अधिकारी सचिन वाझेंच्या मोठ्या कटाचा उलगडा

Share Now


मुंबई – उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेल्या वाहन प्रकरणाचा तपास करणाऱ्या एनआयएने अटकेत असलेल्या पोलीस अधिकारी सचिन वाझेंच्या मोठ्या कटाचा उलगडा केला आहे. एनआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या वाहन प्रकरणी सचिन वाझे दोघांची हत्या करुन त्यांना या प्रकरणात गोवण्याची शक्यता होती. यासंदर्भातील वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.

एक पासपोर्ट सचिन वाझे यांच्या निवासस्थानी सापडला असून या प्रकरणातील हा महत्वाचा पुरावा ठरु शकतो. सध्या या प्रकरणात एन्काऊंटरचा काही प्लॅन होता का याची माहिती एनआयए घेत आहे. याबाबत एनआयएच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन वाझेंच्या निवासस्थानी पासपोर्ट सापडला आहे. त्याचबरोबर आणखी एका व्यक्तीची हत्या करण्याचा कट आखला होता. यानंतर अंबीनींच्या घऱाबाहेर स्फोटकांनी भरलेल्या वाहन प्रकरणात त्यांना गुंतवले जाणार होते.

मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर २५ फेब्रुवारीला स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ सापडली होती. या कटानुसार, त्याच दिवशी एनआयएने ओळख उघड करण्यास नकार दिलेल्या त्या दोन व्यक्तींची हत्या केली जाणार होती. नंतर सचिन वाझे प्रकरणाचा उलगडा केल्याचे श्रेय घेणार होते. सचिन वाझेंच्या घरावर १७ मार्चला धाड टाकली असता हा पासपोर्ट मिळाला होता.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद येथून चोरण्यात आलेली मारुती इको कार ते दोन व्यक्ती चालवणार होते आणि स्फोटकांसह अंबानींच्या घराबाहेर पार्क करणार होते. एनआयएने मिठी नदीतून गाडीची नंबरप्लेट मिळवली आहे. पण सचिन वाझे यांना नशिबाने साथ दिली नाही आणि ही योजना फसली. यानंतर त्यांनी बी प्लॅन वापरला ज्यामध्ये मनसुख हिरेन यांच्या मालकीचे वाहन तिथे पार्क करण्यात आले.

सचिन वाझे एटीएससमोर मनसुख हिरेन यांच्या हत्येची माहितीही देणार असल्याचे सांगण्यात आले होते. एन्काऊंटर स्पेशलिस्ट असतानाही सचिन वाझे यांनी योजना अत्यंत वाईट पद्दतीने आखण्यात आल्याचे तज्ञांनी म्हटले आहे. दरम्यान अद्यापही मनसुख हिरेन यांचा गळा नेमका कोणी दाबला हे स्पष्ट झालेले नाही. दरम्यान सचिन वाझे यांनी अटकेच्या एक दिवस आधी वापरलेला फोन अद्यापही तपास यंत्रणेच्या हाती लागलेला नाही. फोन हाती लागल्यास अनेक प्रश्नांची उत्तरे मिळण्याची शक्यता आहे.

The post एनआयएने केला पोलीस अधिकारी सचिन वाझेंच्या मोठ्या कटाचा उलगडा appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/3shbZKE
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!