maharashtra

दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करणार नाही; वर्षा गायकवाड यांची माहिती

Share Now


मुंबई – केंद्र सरकारने नुकताच सीबीएसईच्या दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. तसेच केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचेही जाहीर केले आहे. दरम्यान राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्यातील दहावीच्या परीक्षा होणार असल्याची माहिती दिली आहे. सध्या तरी दहावी आणि बारावीच्या परीक्षा राज्य सरकार रद्द करणार नाही, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.

सध्या तरी दहावी आणि बारावीच्या परीक्षा राज्य सरकार रद्द करणार नाही. सीबीएसईच्या परीक्षा रद्द केल्या तरी राज्यातील दहावीच्या परीक्षा रद्द करणार नसल्याचे वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.

केंद्रीय शिक्षण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार सीबीएसई परीक्षांबाबत हा निर्णय कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे. दहावीच्या रद्द करण्यात आलेल्या परीक्षांनंतर त्यांच्या गुणपत्रिकांसाठी सीबीएसई बोर्डाकडून विशिष्ट प्रणाली तयार केली जाणार आहे. पण, यामध्ये नेमक्या कोणत्या बाबींचा समावेश असेल? वर्षभरात झालेल्या परीक्षांचे गुण आधारभूत मानले जाणार आहेत का? याविषयी सविस्तर माहिती मिळू शकलेली नाही. दरम्यान, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून आता १ जून रोजी सीबीएसईकडून कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

The post दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करणार नाही; वर्षा गायकवाड यांची माहिती appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/2Q1c34c
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!