maharashtra

सात दिवसांपूर्वी कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्या आशुतोष राणांना कोरोनाची लागण

Share Now


आपल्या दमदार अभिनयामुळे बॉलीवूडमध्ये ओळखल्या जाणाऱ्या अभिनेते आशुतोष राणा यांना कोरोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे त्यांनी सात दिवसांपूर्वीच कोरोना प्रतिबंधक लस घेतली होती. आशुतोष राणा यांनी 6 एप्रिलला कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता. कोरोनाची लागण झाल्यानंतर ते होम क्वारंटाइन झाले आहेत.

दोघांनी लस घेतल्याची माहिती आशुतोष राणा यांची पत्नी अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी एक फोटो शेअर करत दिली होती. लसीकरण केंद्रातील एक फोटो पोस्ट करत तिथल्या डाक्टरांचे आणि टीमचे रेणुका शहाणे यांनी आभार मानले होते.


आपल्या ट्विटमध्ये रेणुका शहाणे म्हणाल्या होत्या, कोरोना लसीकरण केंद्राच्या सर्व वैद्यकीय चिकित्सकांचे, परिचारिकांचे विशेष आभार. आम्ही आज लसीकरणाचा पहिला डोस घेतला. लसीकरण करून घ्या व आवर्जून मास्क लावा, सामाजिक अंतर ठेवा व हात सॅनिटाईझ करत रहा.

The post सात दिवसांपूर्वी कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्या आशुतोष राणांना कोरोनाची लागण appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/3e0cpAa
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!