maharashtra

व्हॉट्सअॅप युजर्स ज्या फिचरची वाट पाहत होते ते नवीन फीचर आले

Share Now


इंस्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप दरवेळेस आपल्या युजर्संसाठी नव नवीन फीचर्स घेऊन येत असतात. यावेळेस आपल्या युजर्संसाठी व्हॉट्सअॅपने ४ डिव्हाइस वर एकत्र चालवण्यासाठी फीचर लाँच केले होते. व्हॉट्सअॅपवर एक नवीन अपडेट आता आले आहे. गेल्या काही दिवसांपासून या फीचरची युजर्स वाट पाहत होते.

यासंदर्भात टेक साइट telecomtalk ने दिलेल्या माहितीनुसार आता व्हॉट्सअॅप ग्रुपच्या मेसेजमधून आपोआप डिलिट होणार आहेत. व्हॉट्सअॅप ग्रुपसाठी Disappearing message फीचरचे बीटा व्हर्जन (Beta Version) लॉन्च झाले आहे. आता ग्रुपमध्ये होत असलेले चॅटिंग आपोआप गायब होतील.

अँड्रॉईड युजर्संसाठी होत असलेल्या लाँचिंग रिपोर्टनुसार, अँड्रॉईड मोबाइल यूजर्ससाठी गुगल प्ले स्टोरमध्ये नवीन फीचर लाँच करण्यात आले आहे. या अॅपमध्ये व्हॉट्सअॅप Beta for Android 2.21.8.7 नावाने नवीन अपडेटला डाउनलोड करू शकता. मिळालेल्या माहितीनुसार, नवीन फीचर आल्यानंतर व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये मेसेज सात दिवसांनंतर आपोआप डिलीट होतील. कंपनीने स्पष्ट केले आहे की, काही वेळेनंतर ग्रुपच्या मेसेजला २४ तासांत गायब होणारे अपडेट येणार आहे.

याबाबत WABetaInfo ने माहिती दिली होती की, व्हॉट्सअॅपच्या ग्रुप मेसेजला गायब होण्याचे फीचर्स केवळ अॅडमिन युज करू शकतो. परंतु, नवीन अपडेटमध्ये या फीचरचा वापर ग्रुपचे सदस्य करू शकतात. पण, व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिन सदस्याला हे अधिकार देऊ शकतो.

नवीन Disappearing message ला युज करण्यासाठी सर्वात आधी Edit Group Info वर टॅप करा. आता या ठिकाणी Disappearing message ला सिलेक्ट करावे लागेल, त्यानंतरच या फिचरचा वापर तुम्ही करु शकता.

The post व्हॉट्सअॅप युजर्स ज्या फिचरची वाट पाहत होते ते नवीन फीचर आले appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/3dhtFBL
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!