maharashtra

ब्रेक द चेन निर्बंधाचा आज पहिला दिवस; जाणून घ्या राज्यात काय सुरु, काय बंद?

Share Now


मुंबई : राज्यावर ओढावलेले कोरानाचे संकट दिवसेंदिवस वाढतच असल्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीतही लक्षणीय वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात 15 दिवसांच्या संचारबंदीची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. बुधवारी रात्री 8 वाजल्यापासून राज्यात 144 कलम लागू करण्यात आले पुढील 15 दिवसांसाठी राज्यात संचारबंदी लागू असणार आहे. याला ‘ब्रेक द चेन’ असे नाव देण्यात आले आहे. ब्रेक द चेन या निर्बंधाचा आज पहिला दिवस आहे. राज्यात पुढील 15 दिवस म्हणजे 1 मे पर्यंत कलम 144 लागू असणार आहे. त्यामुळे विनाकारण कुणालाही बाहेर फिरता येणार नाही.

सर्व जिल्हाधिकारी तसेच पोलीस यंत्रणेने कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता ‘ब्रेक द चेन’मधील निर्बंधांची अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी होईल, याकडे लक्ष द्यावे. कोणत्याही परिस्थितीत आपल्याला गाफील राहून चालणार नाही आणि कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी फैलावलेला परवडणार नाही. ब्रेक द चेन निर्बधांची अंमलबजावणी करताना मनात गोंधळ ठेवू नका, स्पष्टता ठेवा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.

राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्यात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी पासची गरज नाही. पण पोलिसांनी याबाबत जर विचारणा केली तर कारण सांगावे लागणार असल्याची माहिती दिली आहे. पोलीस महासंचालक पुढे बोलताना म्हणाले की, या काळात अनेक दुकान बंद राहणार आहेत. अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहेत. परिस्थिती कठिण आहे. लोक जर बाहेर निघत असतील तर त्यांना आधी विचारले जावे. विनाकारण मारहाण किंवा चार्ज लावू नये, असे आदेश पोलिसांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ते म्हणाले की, जर कुणी कायद्याची पायमल्ली करत असेल. सार्वजनिक संपत्तीची नासधुस करत असेल तर कायद्याप्रमाणे कारवाई करावी. आमची विनंती आहे की, आपण आपली स्वतःची काळजी घ्या आणि मास्क घाला, पोलीस आपल्या बरोबर आहेत.

असे आहेत ब्रेक द चेन निर्बंध

  • काल सायंकाळी 8 वाजल्यापासून निर्बंध लागू झाले आहेत.
  • मतदान झाल्यावर मंगळवेढा-पंढरपूरमध्ये निर्बंध लागू होतील.
  • अनावश्यक बाहेर फिरणे टाळणे.
  • विनाकारण घराबाहेर बाहेर पडू नये.
  • आवश्यक सेवा वगळून इतर सेवा बंद राहतील.
  • अत्यावश्यक सेवा सकाळी 7 ते रात्री 8 सुरु राहतील.
  • अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी लोकल, बस सुरु राहतील.
  • जनावराचे रुग्णालय सुरु राहतील.
  • पावसाळी पूर्व कामे सर्व सुरु राहतील.
  • अधिस्विकृती पत्रकारांना मुभा राहील.
  • हॉटेल्स, रेस्टॉरंट टेक अवे सुरुच राहतील.
  • रस्त्यावरच्या ठेलेवाल्यांनाही टेक अवेची सुविधा द्यावी लागेल.

ब्रेक द चेन अंतर्गत काय बंद राहणार?

  • प्रार्थना स्थळे, शाळा आणि कॉलेज, खाजगी कोचिंग क्लासेस, सलून, स्पा आणि ब्युटी पार्लर 1 मे रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत बंद
  • रेस्टॉरंट्समध्ये बसून खाता येणार नाही.
  • अत्यावश्यक सेवा वगळता इतर कार्यालये बंद
  • कामाशिवाय फिरण्यास बंदी
  • सर्व सार्वजनिक ठिकाणे बंद
  • धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक सभांवर बंदी

The post ब्रेक द चेन निर्बंधाचा आज पहिला दिवस; जाणून घ्या राज्यात काय सुरु, काय बंद? appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/3aaJ58I
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!