maharashtra

राज्यातील शासकीय, वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांचे आज एकदिवसीय ‘कामबंद’ आंदोलन

Share Now


मुंबई : एकीकडे राज्यावर ओढावलेल्या कोरोनाच्या संकटाने कहर केलेला असतानाच दुसरीकडे प्रशासनासमोर वाढती रुग्णसंख्या आणि कोरोनामुळे वाढणारा मृत्यूदर रोखण्याचे आवाहन आहे. अशातच कोरोना संकटात रुग्णांची सेवा करणाऱ्या डॉक्टरांवरच आता आंदोलन करण्याची पाळी आली आहे. आज राज्यातील शासकीय, वैद्यकीय महाविद्यालयं आणि रुग्णालयातील डॉक्टर एकदिवसीय काम बंद आंदोलन करत आहेत. तसेच शासनाने मागण्या मान्य केल्या नाही, तर 22 एप्रिलपासून बेमुदत आंदोलनाचा इशाराही डॉक्टरांनी दिला आहे.

शायकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांना कायमस्वरुपी करा आणि त्यांना सातवा वेतन आयोग लागू करा, अशा मागण्या डॉक्टरांनी केल्या आहेत. डॉक्टर्स मागील दोन वर्षांपासून आपल्या मागण्या मान्य करुन घेण्यासाठी आंदोलन करत आहेत. पण दरवेळेस शासनाने आश्वासन देऊन त्यांचे आंदोलन मागे घेण्यास त्यांना भाग पाडले. पण मागण्या आज मान्य नाही झाल्या तर 22 एप्रिलपासून बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा आंदोलनकर्त्या डॉक्टरांनी दिला आहे.

आंदोलनकर्त्या डॉक्टरांचे असे म्हणणे आहे की, कोरोना संकटात एकाही दिवसाची सुट्टी न घेता, तसेच क्वारंटाईन लीव्ह न घेता हे सर्वजण 24 तास काम करत होते. तरीदेखील सर्व डॉक्टरांच्या मागण्यांकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष झालेले आहे. आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांच्या प्रमुख मागण्या आहेत की, शायकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांना कायमस्वरुपी करा, तसेच शासनाचा जो सातवा वेतन आयोग आहे, तो लागू करा.

अशातच जर डॉक्टरांच्या मागण्या मान्य केल्या तर शासनावर आर्थिक भार येईल, असे चित्र रंगवण्यात येत आहे. पण असे काहीही होणार नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे असल्यामुळे लवकराच लवकर आमच्या मागण्या मान्य करा असा इशारा त्यांनी दिलेला आहे.
दरम्यान, आज 24 तासांचा इशारा राज्यभरातील डॉक्टरांनी प्रशासनाला दिला आहे. शासनाने जर आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर 22 एप्रिलपासून बेमुदत आंदोलनाचा इशाराही डॉक्टरांनी दिला आहे.

The post राज्यातील शासकीय, वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांचे आज एकदिवसीय ‘कामबंद’ आंदोलन appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/3uSDg88
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!