maharashtra

ही सोपी ट्रिक वापरुन व्हॉट्सअॅप मेसेज करा शेड्यूल

Share Now


मुंबई : सध्याच्या घडीला इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप हे सगळ्यांच्या आयुष्यातील अविभाज्य घटक बनले आहे. केवळ चॅटिंगपुरतेच हे अॅप मर्यादित राहिलेले नाही. यामध्ये वॉईस आणि व्हिडीओ कॉलिंगसह पेमेंट करण्याचीही सुविधा मिळते. आपल्या युजरच्या गरजांची व्हॉट्सअॅप नेहमीच काळजी घेते.

दरम्यान आपण आपल्या मित्र-मैत्रिणींना किंवा नातेवाईकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी बऱ्याचदा रात्री 12 वाजेपर्यंत वाट पाहत जागे राहतो. तसेच एखाद्याला महत्त्वाचा मेसेज पाठवायचा असतो, पण तोपर्यंत तुमची वाट पाहण्याची इच्छा नसते. पण आज आम्ही तुम्हाला अशी ट्रिक सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी रात्री उशिरापर्यंत जागे राहण्याची गरज पडणार नाही आणि तुम्हाला हव्या त्या वेळेतच तुमचा मेसेज संबंधितांना मिळेल.

व्हॉट्सअॅपवर अशा प्रकारे तुम्ही मेसेज शेड्यूल करु शकता. तुम्हाला एखाद्याला जर 12 वाजता वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या असतील किंवा एखादा महत्त्वाचा मेसेज करायचा असेल तर आम्ही सांगत असलेली ही ट्रिक तुमच्या नक्की कामाला येईल.

  • व्हॉट्सअॅपवर मेसेज शेड्यूल करण्यासाठी गूगल प्ले स्टोअरवरुन SKEDit नावाचे थर्ड पार्टी अॅप तुम्हाला सर्व प्रथम डाऊनलोड करावे लागेल.
  • अॅप डाऊनलोड केल्यानंतर अॅप ओपन करुन साईन अप करावे लागेल.
  • आता लॉगइन केल्यानंतर मेन्यूमध्ये दिलेल्या व्हॉट्सअॅप ऑप्शनवर टॅप करा.
  • ऑप्शनवर टॅप केल्यानंतर तुमच्याकडून काही परवानग्या मागितल्या जातील.
  • त्यानंतर Enable Accessibility वर क्लिक करुन Use service वर टॅप करा.
  • आता ज्या कोणत्या व्हॉट्सअॅप चॅटवर तुम्हाला मेसेज शेड्यूल करायचा आहे, त्याचा कॉन्टॅक्ट अॅड करा. मग मेसेज टाईप करुन तारीख आणि वेळ सेट करा.
  • त्यानंतर तुम्ही निश्चित केलेली तारीख आणि वेळेवर मेसेज आपोआप संबंधित कॉन्टॅक्टला जाईल.

The post ही सोपी ट्रिक वापरुन व्हॉट्सअॅप मेसेज करा शेड्यूल appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/3ggQibh
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!