maharashtra

दक्षिणेतील दिग्गज दिग्दर्शकासोबत काम करणार रणवीर सिंह

Share Now


अभिनेता रणवीर सिंह याचेही नाव बॉलिवूडच्या लोकप्रिय कलाकारांमध्ये आघाडीवर आहे. लवकरच एका मोठ्या दाक्षिणात्य सुपरहिट चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये तो दिसणार आहे. रणवीरची ही भूमिका त्याच्या आत्तापर्यंतच्या भूमिकांपेक्षा वेगळी असणार आहे.


वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट करताना सध्या रणवीर दिसत आहे. रणवीर सुप्रसिद्ध दाक्षिणात्य दिग्दर्शक शंकर यांच्या आगामी चित्रपटात दिसणार आहे. सुपरहिट दाक्षिणात्य चित्रपट ‘अन्नियन’ याचा हा चित्रपट हिंदी रिमेक असणार आहे. हा एक सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपट असणार आहे. २००५ साली मूळ तमिळ चित्रपट रिलीज झाला होता. यात अभिनेता विक्रमने मुख्य भूमिका साकारली होती.


याबद्दलची माहिती रणवीरने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. तो म्हणतो, ही घोषणा करताना मला अभिमान वाटत आहे की भारतीय चित्रपटाच्या एका दूरदर्शी कलाकार शंकरसोबत मी काम कऱणार आहे. प्रसिद्ध निर्माते जयंतीलाल गडा ह्या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. हा मूळ चित्रपट ‘अपरिचित’ या नावाने हिंदीत डब करण्यात आला होता. याला भारताच्या सर्वच प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला होता.

The post दक्षिणेतील दिग्गज दिग्दर्शकासोबत काम करणार रणवीर सिंह appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/3dgDlfM
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!