maharashtra

तारक मेहता…च्या सेटवरील चौघांना कोरोनाची लागण

Share Now


देशावर ओढावलेले कोरोना संकट दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यातच आता छोट्या पडद्यावरील लोकप्रिय तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील चार जणांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर येत आहे. या मालिकेत आत्माराम तुकाराम भिडे ही भूमिका साकारणाऱ्या मंदार चांदवडकर या कलाकाराला काही दिवसांपूर्वीच कोरोनाची लागण झाली होती.

नव्या नियमांप्रमाणे ११० जणांच्या या मालिकेच्या सेटवर आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या. ज्यापैकी चार जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यासंदर्भात आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी या विषयी भाष्य केले आहे. त्यांनी सांगितले, बाहेर जाऊन चित्रीकरण करण्याविषयी आम्ही काही विचार केलेला नाही. कारण तीन चार दिवसांपूर्वी जे निर्बंध लावण्यात आले त्यावरुन चित्रीकरण थांबेल असे वाटले नव्हते. कारण त्यानुसार सेटवरच्या सर्व लोकांच्या आरटीपीसीआर चाचण्या करणे बंधनकारक होते. आम्ही त्या केल्या, त्यादरम्यान चार जण पॉझिटिव्ह आढळले. पण त्यांना आम्ही आधीच विलगीकरणात ठेवले होते.

ते पुढे म्हणतात, या चार जणांपैकी काही कलाकार आहेत तर काही तंत्रज्ञ आहेत. पण इतर सर्वांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आम्ही एरवी चित्रीकऱणादरम्यान सर्व काळजी घेत असतो. जर कोणी थोडे जरी आजारी असेल, तरी आम्ही त्याला चित्रीकऱणाला येण्यापासून मनाई करतो. कोरोनाची लागण ज्यांना झाली आहे, तो सध्या मालिकेत गोली ही भूमिका साकारत आहे. तर बाकीचे काही तंत्रज्ञ आहेत. मुख्य कलाकार कोणीही नाही. पण जे पॉझिटिव्ह आहेत, ते सर्वजण गृह विलगीकरणात आहेत. बाकी सर्वजण सुखरुप आहेत.

असित कुमार चित्रीकरण थांबवण्याच्या निर्णयावर म्हणाले, आधी सर्व सदस्यांच्या आरटीपीसीआर चाचण्या निगेटिव्ह आल्यानंतर चित्रीकऱणाची परवानगी मिळत होती. पण आता १५ दिवसांसाठी चित्रीकरणावर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. आम्हाला वाटले होते की आम्ही बायो बबलच्या सहाय्याने चित्रीकरण करु शकू. पण सरकारच्या निर्णयाशी आम्ही सहमत आहोत. त्यांना परिस्थितीची जास्त जाण आहे. त्यांचा निर्णय सर्वांच्या भल्यासाठीच असेल.

The post तारक मेहता…च्या सेटवरील चौघांना कोरोनाची लागण appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/3tpFrzI
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!