maharashtra

आता जूनमध्ये होणार वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा – अमित देशमुख

Share Now


मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत येत्या १९ एप्रिल पासून घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे.

आता येत्या जूनमध्ये या परीक्षा घेण्यात येणार असून परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात येईल. आपली या परीक्षा पुढे ढकलण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्याशीही चर्चा झाली असल्याची माहितीही वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे.

The post आता जूनमध्ये होणार वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा – अमित देशमुख appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/3acy6Md
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!