maharashtra

मनसारखा जोडीदार मिळवून देण्यासाठी आता फेसबुक करणार मदत

Share Now


सोशल मीडियात अग्रेसर असलेले प्लॅटफॉर्म फेसबुक आता लवकरच एक डेटिंग अ‍ॅप लाँच करणार आहे. युजर्स या अ‍ॅपवर एखाद्या व्यक्तिला पसंत करुन, त्याच्याशी डेट करू शकतात. या अ‍ॅपचे नाव स्पार्क्ड (Sparked) असे असून हे अ‍ॅप सध्या टेस्टिंग फेजमध्ये आहे. फेसबुकचा दावा आहे की, इतर सर्व डेटिंग अ‍ॅप्सहून हे नवे अ‍ॅप वेगळे असणार आहे. हे अ‍ॅप अ‍ॅक्सेस करणेही अधिक चॅलेजिंग असणार आहे.

फेसबुकने दिलेल्या माहितीनुसार, युजर्ससाठी स्पार्क्ड अ‍ॅप मोफत असणार आहे. युजर्स हे अ‍ॅप फेसबुक अकाउंटसोबत लॉगइन करू शकतात. Sparked App मध्ये युजर्ससाठी एक व्हिडीओ स्पीड डेटिंग ऑफर केली जाईल.

Verge ने दिलेल्या रिपोर्टनुसार, या अ‍ॅपमध्ये 4 मिनिटांची पहिली व्हिडीओ डेट असणार आहे. त्यात व्हिडीओमध्ये युजरला स्वत:बद्दल माहिती द्यावी लागेल. हा व्हिडीओ दुसऱ्या युजर्सला दाखवला जाईल. जर समोरच्या युजरला तुमचा व्हिडीओ आवडला तर त्याच्यासोबत डेटिंगची संधी मिळेल. पहिल्या डेटनंतर, जर दोन्ही युजर्स पुन्हा व्हिडीओ डेटवर आल्यास, दुसरी व्हिडीओ डेट 10 मिनिटांची असेल. एकदा व्हिडीओ अपलोड झाल्यानंतर फेसबुक टीम याची तपासणी करेल. त्यानंतरच युजरला या डेटिंग अ‍ॅपमध्ये एन्ट्री मिळेल.

चार मिनिटांचा व्हिडीओ फेसबुकच्या या डेटिंग अ‍ॅपमध्ये एन्ट्री घेण्यासाठी आधी बनवावा लागेल. यात स्वत: बद्दल माहिती द्यावी लागेल. तसेच तुम्हाला कोणाला डेट करायचे आहे, हे देखील सांगावे लागेल. रिपोर्टनुसार, लोक या डेटिंग अ‍ॅपद्वारे एकमेकांच्या संपर्कात येतील. डेटिंगवर मॅच मिळाल्यानंतर युजरकडे इन्स्टाग्राम किंवा ईमेलद्वारे बातचीतची संधी आहे. दरम्यान, फेसबुकने अमेरिका आणि युरोपमध्ये एक खास डेटिंग अ‍ॅप फेसबुक डेटिंग नावाने लाँच केले होते.

The post मनसारखा जोडीदार मिळवून देण्यासाठी आता फेसबुक करणार मदत appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/3dkxAxs
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!