maharashtra

ड्रायव्हिंग लायसन्स आणि रिन्यू करण्यासाठी सरकारची नवी नियमावली

Share Now


मुंबई : ड्रायव्हिंग लायसन्स, आरसी, इन्श्युरन्स आणि वाहनांशी संबंधित अन्य कागदपत्रे रिन्यू करण्याची शेवटची तारीख 30 जून असून आता ही तारीख रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून पुन्हा वाढवली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तर दुसरीकडे अनेक ठिकाणी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. अशा काळात तुम्हाला तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करायचे असेल तर काळजी करण्याची गरज नाही. कारण ड्रायव्हिंग लायसन्स आणि ते रिन्यू करण्यासाठी नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. त्यामुळे आता तुम्ही घरबसल्या तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स बनवू शकणार आहात.

आता नव्या नियमावलीनुसार लर्निंग लायसन्ससाठी संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली आहे. यामध्ये अर्ज करण्यापासून ते प्रिंट काढण्यापर्यंत सर्व प्रक्रिया ऑनलाईन असणार आहे. त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक सर्टिफिकेट आणि कागदपत्रांचा वापर मेडिकल सर्टिफिकेट, लर्नर लायसन्स, ड्रायव्हिंग लायसन्स सरेंडर आणि त्याच्या रिन्यूअलसाठी केला जाऊ शकतो.

लोकांच्या सोयीसाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून नव्या गाडीची रजिस्ट्रेशन प्रक्रियाही सोपी बनवली आहे. त्यामुळे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटचे रिन्यूअल तुम्ही 60 दिवस आधी अॅडव्हान्समध्ये करु शकणार आहात. त्याचबरोबर टेम्पररी रजिस्ट्रेशनसाठी वेळीची मर्यादाही आता 1 महिन्यावरुन वाढवून 6 महिने करण्यात आली आहे.

लर्नर लायन्सनसाठीच्या प्रक्रियेतही रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने काही बदल केले आहेत. यामध्ये आता ड्रायव्हिंग टेस्टसाठी तुम्हाला RTO कार्यालयात जाण्याची गरज नाही. हे काम तुम्ही ट्युटोरियलच्या माध्यमातून घरबसल्याही करु शकणार आहात. कोरोना काळात संबंधित मंत्रालयाने घेतलेला हा निर्णय नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरत आहे.

अशा प्रकारे रिन्यू करु शकता वाहन परवाना

  • भारत सरकारच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन ड्रायव्हिंग परवाना रिन्यू करण्यासाठी सगळ्यात आधी https://ift.tt/2qRp8xu जा.
  • तेथे गेल्यावर डावीकडील ऑनलाईन पर्यायावर क्लिक करा.
  • यानंतर तुम्ही ‘सर्विसेस ऑन ड्राइविंग लाइसेंस’ वर क्लिक करा आणि पुढील दिलेली माहिती भरा.
  • अर्जामध्ये दिलेली माहिती भरून सोबत कागदपत्रेही जोडा.
  • अर्ज आणि कागदपत्रे व्यवस्थित भरल्यानंतर ऑनलाईन प्रोसेस पूर्ण होईल.
  • यानंतर काही दिवसांत तुम्ही दिलेल्या पत्त्यावर ड्रायव्हिंग परवाना येईल.

The post ड्रायव्हिंग लायसन्स आणि रिन्यू करण्यासाठी सरकारची नवी नियमावली appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/3adR7O6
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!