maharashtra

सीबीआयचे माजी संचालक रणजीत सिन्हा यांचे निधन

Share Now


नवी दिल्ली : आज पहाटे चारच्या सुमारास केंद्रीय अन्वेषण ब्युरो अर्थात सीबीआयचे माजी संचालक रणजीत सिन्हा यांचे निधन झाले आहे. दिल्लीत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 68 वर्षांचे होते. रणजीत सिन्हा यांनी आपल्या कारकीर्दीत सीबीआय संचालक, आयटीबीपी महासंचालक यांसारख्या महत्त्वाच्या पदांची जबाबदारी सांभाळली होती.

रणजीत सिंह 1974 बॅचचे आयपीएस अधिकारी होते. सीबीआयचे संचालक म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी ते भारत-तिबेट सीमा पोलीस (आयटीबीपी) चे महासंचालक पदावर कार्यरत होते. भ्रष्टाचाराचे आरोपही रणजीत सिन्हा यांच्यावर झाले होते. त्यांच्याविरोधात सीबीआयने भ्रष्टाचाराचा गुन्हाही दाखल केला होता. सीबीआयचे प्रमुख असताना कोळसा घोटाळ्याचा तपास प्रभावित करण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप त्यांच्यावर झाला होता.

त्यांना 22 नोव्हेंबर 2012 रोजी दोन वर्षांसाठी सीबीआयचे प्रमुख बनवण्यात आले होते. रणजीत सिन्हा यांनी रेल्वे सुरक्षा दलाचे नेतृत्त्व तसेच पाटणा आणि दिल्ली सीबीआयमध्ये वरिष्ठ पदावर काम केले होते.

The post सीबीआयचे माजी संचालक रणजीत सिन्हा यांचे निधन appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/3wYLRrE
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!