maharashtra

राज ठाकरेंनी मानले नरेंद्र मोदींचे आभार

Share Now


मुंबई – कोरोना प्रतिबंधक लसींचे उत्पादन वाढावे यासाठी हाफकीन सारख्या संस्थांना लसींच्या उत्पादनाची परवानगी द्यावी अशी मागणी आपण पंतप्रधानांकडे केली होती, जी त्यांनी मान्य केल्याचे ट्विट मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केले आहे. मी यासाठी पंतप्रधानांचा आभारी असून या महामारीवर मात करण्यासाठी केंद्र सरकार कायमच सहाय्य करेल, अशी आशाही राज यांनी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्रातील कोरोना लसींच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी आणि लसीकरणाला वेग देण्यासाठी हाफकीन संस्थेला लस उत्पादन करण्याची परवानगी देण्याची मागणी महाराष्ट्र सरकारनेही केंद्र सरकारकडे केली होती. ती मागणी केंद्राने मान्य करत परवानगी दिली असून, त्याबद्दल केंद्र सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आभार मानले आहेत. हाफकिन संस्थेस भारत बायोटेककडून तंत्रज्ञान हस्तांतरण पद्धतीने कोव्हॅक्सिन बनविण्यास केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने मान्यता दिली आहे.

राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सचिव रेणू स्वरूप यांनी गुरूवारी परवानगी बाबत एक पत्र पाठवले आहे. सध्याचा वाढता संसर्ग आणि लसीकरणाची मागणी पाहता लवकरात लवकर हाफकिन बायो फार्मा कॉर्पोरेशन यांनी उत्पादन सुरु करावे तसेच हाफकिन मध्ये यादृष्टीने लसीसंदर्भात आवश्यक त्या अनुभवी व प्रशिक्षित तंत्रज्ञांची नियुक्ती व्हावी, असे या पत्रात म्हटले आहे. दरम्यान, हाफकीनला लस उत्पादनाची परवानगी द्यावी अशी मागणी आपण पंतप्रधानांकडे केली होती, ज्या मागणीला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे राज ठाकरे यांनीही म्हटले आहे.

The post राज ठाकरेंनी मानले नरेंद्र मोदींचे आभार appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/3mPmaoP
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!