maharashtra

करणच्या ‘दोस्ताना’मधून कार्तिक आर्यन बाहेर

Share Now


बॉलिवूडचा डॅडी अर्थात प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक करण जोहरच्या ‘दोस्ताना २’मध्ये मुख्य भूमिकेत दिसणाऱ्या अभिनेता कार्तिक आर्यनला रिप्लेस करण्यात आले आहे. २०१८मध्ये ‘दोस्ताना २’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर कार्तिक आणि अभिनेत्री जान्हवी कपूर या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचे सांगण्यात आले होते. पण आता कार्तिकच्या ऐवजी दुसऱ्या एका अभिनेत्याला मुख्य भूमिकेत घेतले असल्याचे समोर आले आहे.

याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ‘दोस्ताना २’ चित्रपटाचे चित्रीकरण कार्तिकने सुरु केले होते. त्याने २० दिवसांचे चित्रीकरण झाल्यानंतर पुढील डेट्स देण्यास नकार दिला होता. सध्या अनेक प्रोजक्ट्स कार्तिककडे असल्यामुळे तो इतर कामात व्यस्त आहे. तसेच या चित्रपटाची स्क्रिप्ट देखील कार्तिकला फारशी आवडली नसल्यामुळे त्याने डेट्स दिल्या नसल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे आता करण जोहरने त्याला चित्रपटातून काढून टाकल्याचे समोर आले आहे.

जान्हवी कपूर आणि कार्तिक आर्यनने २०१९मध्ये नोव्हेंबर महिन्यात चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली होती. अमृतसर येथे चित्रीकरण करतानाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता ‘दोस्ताना २’ या चित्रपटात कोणता अभिनेता मुख्य भूमिकेत दिसणार हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. या चित्रपटात अभिनेत्री जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

The post करणच्या ‘दोस्ताना’मधून कार्तिक आर्यन बाहेर appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/2OSmp5M
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!