maharashtra

केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकरांना कोरोनाची लागण

Share Now


मुंबई – देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस अजूनच वेगाने होत आहे. कोरोनाच्या विळख्यात सर्वसामान्यांपासून ते अगदी राजकीय मंडळींपर्यंत सर्वजण सापडत आहेत. दरम्यान आज(शुक्रवार) केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री व भाजप नेते प्रकाश जावडेकर यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.


याबाबतची माहिती स्वतः जावडेकर यांनी ट्विट करत दिली आहे. मी कोरोनाबाधित झालो असून मागील दोन-तीन दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्यांनी कृपया स्वतःची तपासणी करून घ्यावी, असे जावडेकर यांनी म्हटले आहे.

The post केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकरांना कोरोनाची लागण appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/3x16Wlm
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!