maharashtra

युवा ब्रिगेडच्या आवडत्या बिअर संबंधी कांही

Share Now


आजकाल युवा ब्रिगेड बिअर पिण्यासाठी कांही ना कांही निमित्ताच्या शोधात असते. लग्न असो, पार्टी असो, गेट टुगेदर असो, बोअर होत असेल तरी बिअर हाच त्यावरचा उपाय मानला जातो. आजकाल बिअर पिणे ही फॅशन बनली आहे. या बिअरविषयी कांही इंटरेस्टींग गोष्टीही अशा वेळी आपल्याला माहिती हव्यात नाही का?

जगात कोणत्याही वेळा ०.०७ टक्के लोक बिअर पित असतात म्हणजे अगदी आत्ता यावेळीही किमान ५ कोटी लोकांच्या हातात बिअरचे प्याले असणार. असेही सांगतात की आळशी लोकांना बिअर जास्त आवडते.


१९७० च्या दशकापर्यंत बेल्जियममध्ये शाळेच्या कँटीनमध्ये बिअर मिळत असे. नेदरलँडमध्ये दारूड्यांना बिअर देऊन त्यांच्याकडून रस्ते सफाई करून घेतली जाते. फिनलंडमध्ये बायकोला उचलून पळण्याच्या स्पर्धेत जो जिंकेल त्याला बायकोच्या वजनाइतकी बिअर बक्षीस म्हणून दिली जाते. थायलंडमध्ये १० लाख बिअरच्या बाटल्यांपासून सुंदर मंदिर बांधले गेले आहे. इजिप्तमध्ये पूवी बिअरचा वापर पैशांप्रमाणे केला जात असे.


१९९२ साली संशोधक नील बोहर यांना नोबल पारितोषिक मिळाले तेव्हा त्याच्या सन्मानासाठी त्यांच्या घरात पाईपने बिअर पुरविली गेली होती. १९६३ सालापर्यंत बिअरच्या बाटल्या अशा आकाराच्या बनविल्या जात की त्यांचा विटांप्रमाणे वापर करता येत असे. पाणी, चहा नंतर सर्वाधिक प्यायल्या जाणार्‍या पेयात बिअरचा नंबर तिसरा आहे. ऑस्ट्रीयात बिअरचा स्विमिंग पूल आहे.

कडू, गडद रंगाच्या बिअरमध्ये जादा अल्कोहोल असते. अमेरिकन टिव्हीवर बिअर पिताना दाखविणे बॅन आहे. जगात ४०० प्रकारच्या बिअर आहेत व त्यातील सर्वाधिक प्रकार बेल्जियममध्ये बनतात.


व्हील्का बोर्न सेक्योर्स ही जगातील सर्वात महाग बिअर असून तिची १ बाटलीची किंमत १ हजार अमेरिकन डॉलर्स आहे. संशोधकांच्या मते बिअर पिणार्‍यांना मूतखडा होण्याचा धोका कमी असतो. तसेच बिअर प्राशन केल्याने हाडे मजबूत होतात. बिअरमध्ये असलेले सिलीकॉन हाडांतील कॅल्शियमचे प्रमाण वाढविते.


ज्या बिअरचा फेस सर्वात जास्त असतो तितकी तिची क्वालिटी उत्तम मानली जाते. अर्थात बिअरवर येणारा फेस हा कार्बन डाय ऑक्साईडमुळे येत असतो.

The post युवा ब्रिगेडच्या आवडत्या बिअर संबंधी कांही appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/3gj0q3a
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!