maharashtra

उपाशी न राहता वजन कमी करा

Share Now

diet


माणसाचे वजन तो जे काही खाते त्यामुळे वाढत असते. म्हणून वजन कमी करायचे असेल तर खाणे कमी केले पाहिजे. असे सांगितले जाते आणि बरेच लोक वजन कमी करण्याकरिता उपासमार करायला लागतात. या उपासमारीने कदाचित त्यांचे वजन कमी होतही असेल पण त्यातून इतर अनेक प्रश्‍न निर्माण व्हायला लागतात. त्यामुळे काही तज्ञांचे मत असे आहे की उपाशी राहून नव्हे तर खाऊनसुध्दा वजन कमी करता येते. त्यांच्या या नव्या संशोधनामुळे लोकांच्या मनात खाऊन वजन कमी करण्याच्या कल्पनेविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.

माणसाचे वजन खाल्लेल्या अन्नामुळे वाढते असा समज असला तरी प्रत्यक्षात तसे नसते. त्याचे वजन त्याच्या अन्नातल्या उष्मांकामुळे वाढत असते. त्यामुळे आपले वजन कमी करणे हे किती कमी उष्मांकाचे अन्न खातो आणि खाल्लेल्या अन्नातील उष्मांकाचे ज्वलन तो कसे करतो यावर अवलंबून असते. तेव्हा उपासमार करण्यापेक्षा अन्न खावे परंतु अन्नातल्या उष्मांकावर लक्ष द्यावे आणि उष्मांकाचे ज्वलन कसे करतो यावरही लक्ष द्यावे. याच तंत्राला कॅलरी डेफिसीट असे म्हटले आहे.

एक किलो वजन कमी करायचे असेल तर १ हजार उष्मांकाचे कॅलरी डेफिसीट करावे. दररोज १ हजार उष्मांक कमी घेतले तर ७ ते ८ दिवसात वजन १ किलोने कमी होते. त्यासाठी हलके अन्न खावे आणि आपण दिवसभरात जे काही खातो तेच अन्न आणि तेवढेच अन्न ६ ते ७ वेळा विभागून खावे. म्हणजे उष्मांकाचे ज्वलन होते. शिवाय अन्न आणि आहार हा संतुलित असावा. त्यामध्ये कर्बोदके, प्रथिने आणि फॅटस् यांचे संतुलित विभाजन असावे. द्रव पदार्थ भरपूर घ्यावेत आणि जेवणामध्ये फळे भरपूर असावीत.

The post उपाशी न राहता वजन कमी करा appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/3edUG8a
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!