maharashtra

तुमच्या डोळ्यांचा रंग तुमच्या व्यक्तिमत्वाबद्दल काय सांगतो?

Share Now

eye


एखाद्या व्यक्तीच्या डोळ्याचा रंग त्या व्यक्तीकडे आपल्याला आकर्षित करून घेतो. डोळ्यांचा सुंदर रंग त्या व्यक्तीच्या चेहऱ्याचे सौदर्य अधिकच खुलवितो. पण त्याही पुढे जाऊन एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यांचा रंग त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाबद्दलही खूप काही सांगत असतो, असे निदान वैज्ञानिकांनी केलेले आहे. स्वीडन येथील ओरेब्रो विद्यापीठामध्ये कार्यरत असणाऱ्या वैज्ञानिकांनी अनेक प्रयोगांच्या जोरावर आणि अभ्यासानन्तर हे निदान केलेले आहे. या रिसर्चनुसार डोळ्यांचे निरनिराळे रंग निरनिराळी व्यक्तिमत्वे दर्शवितात. शरीरामध्ये मेलानिनचे प्रमाण जितके अधिक असते, तितका डोळ्यांचा रंग गडद असतो.
eye1
ज्या व्यक्तींचे डोळे गडद ब्राऊन रंगाचे असतात, अश्या व्यक्तींमध्ये नेतृत्वगुण जात्याच असतात. या व्यक्ती सहजासहजी कोणासमोर नमते घेत नाहीत. त्याचबरोबर या व्यक्ती अतिशय नम्र, विश्वासू, आणि अतिशय इमानदार असतात. या व्यक्ती कितीही दमलेल्या असल्या, तरी थोड्याश्या विश्रांतीनंतरच अगदी तरतरीत होतात. मात्र सकाळी लवकर उठणे या व्यक्तींना फारसे आवडत नाही. मात्र आवश्यकता असल्यास या व्यक्ती आपल्या झोपेच्या वेळापत्रकामध्ये सहज बदल करू शकतात.
eye3
ज्या व्यक्तींचे डोळे निळे असतील अश्या व्यक्ती मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या बळकट असतात. इतरांना मात्र प्रथमदर्शनी या व्यक्ती काहीशा बुजऱ्या वाटू शकतात. या व्यक्तींचा खरा स्वभाव ओळखण्यास काही अवधी लागू शकतो. अश्या व्यक्ती काहीशा संकुचित मनाच्या आणि नव्या गोष्टींचा पटकन स्वीकार न करणाऱ्या असू शकतात. ज्या व्यक्तींचे डोळे काहीसे राखाडी रंगाचे असतात, अश्या व्यक्ती संतुलित मनोवृत्तीच्या असतात. तसेच समोरचा मनुष्य पाहून त्याच्याशी कसे वागायचे हे ठरवितात.
eye2
ज्यांचे डोळे घारे असतात, अश्या व्यक्ती अतिशय आकर्षक व्यक्तित्वाच्या असतात. या व्यक्ती अतिशय कल्पक असून, एखाद्या कामाची जबाबदारी यांच्यावर सोपाविल्यानंतर हे काम अतिशय चोखपणे पार पाडण्यात यांचा हातखंडा असतो. या व्यक्तींना इतरांच्या मदतीची फारशी आवश्यकता पडत नाही. स्वतःच्या आत्मविश्वासाच्या आणि मेहनतीच्या बळावर या व्यक्ती सर्व अडचणींमधून मार्ग काढतात. ज्या व्यक्तींचे डोळे गडद किंवा काळे असतात, अश्या व्यक्ती आपल्या मनातील गुपिते इतरांसमोर पटकन उघड करीत नाहीत. या व्यक्ती स्वभावाने अतिशय मनमिळावू असल्या तरी यांच्या मनामध्ये नेमके काय चाललेले आहे याचा थांग त्या सहज लागू देत नाहीत. इतरांशी पटकन मैत्री करणाऱ्या अश्या या व्यक्ती असतात. अतिशय बोलक्या, आत्मविश्वासाने परिपूर्ण आणि स्वभावाने मृदू अश्या या व्यक्ती असतात.

The post तुमच्या डोळ्यांचा रंग तुमच्या व्यक्तिमत्वाबद्दल काय सांगतो? appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/2QC59m4
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!