maharashtra

जाणून घेऊ या आईसलंड देशाबद्दल काही रोचक तथ्ये

Share Now

iceland


अग्नी आणि हिमाचा प्रदेश, अतिशय सुस्वभावी आणि प्रेमळ लोक असणारा, आणि स्कँडीनेव्हियन परंपरेचे माहेरघर म्हणून आईसलंड हा देश ओळखला जातो. उत्तर अटलांटिक महासागरामध्ये असलेले हे द्वीप अतिशय लोकप्रिय पर्यटन स्थळ असून, दरवर्षी सुमारे एक मिलियन पर्यटक या देशाला भेट देण्यासाठी येत असतात. अश्या या सुंदर देशाबद्दल काही रोचक तथ्ये जाणून घेऊ या. या देशाची मुख्य विशेषता अशी, की या देशामध्ये डास अजिबात नाहीत. इतकेच काय तर या देशामध्ये साप हा प्राणी नावाला देखील सापडत नाही. नाही म्हणायला कोळी या किड्याच्या काही प्रजाती या देशामध्ये सापडतात. मात्र या प्रजातींपैकी कोणतीही प्रजाती मनुष्याला घातक नाही.
iceland1
आईसलंड हा पर्यावरणप्रेमी देश आहे. पर्यावरणाची सुरक्षा येथील जीवनशैलीचा भाग आहे. या देशामध्ये सगळीकडे पुरविली जाणरी वीज, पर्यावरणाची सुरक्षा ध्यानी ठेऊन निर्माण केली जाणारी हायड्रोइलेक्ट्रिसिटी आणि ‘जियोथर्मल वॉटर रीझर्व्ह्ज’ चा वापर करून निर्माण करण्यात येते. या देशामध्ये सार्वजनिक वाहने देखील हीच उर्जा वापरून चालविली जातात. आजकाल जवळजवळ प्रत्येक लहान मोठ्या शहरामध्ये ठिकठिकाणी आढळणारी आणि अतिशय लोकप्रिय असणारी ‘मॅकडॉनल्ड्स’ ही फूड चेन आईसलंड मध्ये पाहायला मिळत नाही. या फूड चेन द्वारे तीन आऊटलेट्स आईसलंडमध्ये सुरु करण्यात आली होती, पण केवळ ३००,००० इतक्या लहानशा लोकसंख्येच्या देशामध्ये ही फूडचेन फारशी प्रसिद्धी मिळवू शकली नाही, आणि लवकरच ही आऊटलेट्स बंद करण्यात आली.
iceland2
आईसलंड हा जगातील सर्वात शांतीप्रिय देश समजला जात असून, या देशाकडे स्वतःचे सैन्य देखील नाही. १८६९ सालापासूनच या देशाकडे स्वतःचे सैन्य नाही. हा देश ‘नाटो’ समूहाचा भाग असून, गरज भासल्यास सुरक्षा पुरविण्यासाठी या देशाने अमेरिकेशी करार केला आहे. या देशामध्ये शीत ऋतूमध्ये रात्री जास्त काळ असतात, तर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये दिवस जास्त मोठा असतो. या देश आर्क्टिक सर्कलच्या अतिशय जवळ आहे. या भौगोलिक स्थितीचा लाभ म्हणजे या देशामध्ये ‘नॉर्दर्न लाईट्स’चे घडणारे मनोरम दर्शन. आईसलंडमध्ये शीतऋतूचा काळ मात्र काहीसा कठीण असून या ठिकाणी डिसेंबरच्या महिन्यामध्ये चोवीस तासांची रात्र, तर जूनच्या महिन्यामध्ये चोवीस तास दिवस असतो.

The post जाणून घेऊ या आईसलंड देशाबद्दल काही रोचक तथ्ये appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/3mXeukw
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!