maharashtra

घरगुती गॅस सिलिंडर का असतात लाल आणि दंडगोल?

Share Now

cylinder
आजच्या काळात घरोघरी स्वयंपाक करण्यासाठी गॅस वापरला जातो. भारतासारख्या गरीब देशात ग्रामीण भागातील महिलांसाठी केंद्र सरकारने सुरु केलेल्या उज्वला योजनेतून कोट्यावधी गॅस कनेक्शन दिली गेल्याचे आपण वाचले असेल. पण या एलपीजी म्हणजे लिक्विड पेट्रोलियम गॅस सिलिंडरचा रंग बहुतेक वेळा लाल असतो आणि त्याचा आकार दंडगोल असतो असे दिसते. या मागे काही कारणे आहेत. ती आपण जाणून घेतली पाहिजेत.

एलपीजी हा रंगरहित आणि वासरहित गॅस आहे मात्र घरात सिलिंडर बदलताना चटकन लक्षात येथे कि या गॅसला एक ठराविक वास येतो. त्याचे कारण म्हणजे एलपीजी अतिशय ज्वालाग्राही आहे त्यामुळे तो सिलिंडर मधून लिक होत असेल तर दुर्घटना घडण्याची शक्यता मोठी असते यामुळे या वायूत इथील मर्सेटेन मिसळले जाते आणि आपल्याला जो उग्र वास येतो तो या एथाईलचा असतो. त्याचा फायदा असा की गॅस सिलिंडर मधून गळत असेल तर ताबडतोब कळते आणि वेळीच गॅस गळती थांबविण्यासाठी उपाययोजना करता येतात.

transport
दुसरे म्हणजे हे सिलिंडर दंडगोल आकाराचे असतात. याचे कारण असे कि यामुळे गॅस सिलिंडर वाहतूक करत असताना एकमेकांवर ठेवले गेले तरी सिलिंडरवर एकसारखा दाब पडतो. कुठे जास्त दाब कुठे कमी असे होत नाही कारण एखाद्या जागी जास्त दाब पडत असेल तर ते धोकादायक ठरू शकते. रिकामा सिलिंडर १५.३ किलो वजनाचा असतो आणि त्यात १४.२ किलो गॅस भरल्यावर त्याचे वजन २९.५ किलोवर जाते. विविध कंपन्यांच्या सिलिंडरचे वजन वेगवेगळे असते.

घरगुती वापराच्या सिलिंडरचा रंग सर्वसामान्यपणे लाल असतो तर व्यावसायिक सिलिंडर निळ्या रंगाचा आणि त्यामध्ये लाल रंगाची पट्टी असते. लाल रंग असण्यामागे नियम नाही पण लाल रंग हा दुरूनही दिसतो, तसेच धोका दर्शविण्यासाठी लाल रंग वापरला जातो. एलपीजी ज्वालाग्राही असल्याने त्याची वाहतूक काळजीपूर्वक कारवाई लागते आणि दुरूनही ही वाहने त्यातील लाल रंगाच्या सिलिंडरमुळे चटकन ओळखू येतात आणि दुर्घटना टाळता येते. विविध देशात विविध रंगाचे सिलिंडर वापरले जातात. कुठे ते हिरवे असतात तर कुठे पांढरे, पिवळेही असतात.

expiry
सिलिंडरच्या वरच्या भागात इंग्रजी A B C D अशी अक्षरे आणि एक संख्या लिहिलेली असते. त्यावरून सिलिंडरची एक्सपायरी कळते. ए बी सी डी ही अक्षरे तिमाहीची सूचक आहेत. ए म्हणजे जानेवारी ते मार्च असे तीन महिने. त्यापुढे जी संख्या असते ते साल असते. म्हणजे ए १८ असले तर जानेवारी ते मार्च २०१८ अशी त्याची एक्सपायरी मानली जाते.

The post घरगुती गॅस सिलिंडर का असतात लाल आणि दंडगोल? appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/3tslnN0
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!